टोमॅटो रोप लागवडीसाठी कागदी कप केव्हा व कशासाठी वापरावेत? 

टोमॅटो रोप लागवडीसाठी कागदी कप का वापरावेत?

✅ज्यावेळेस हिवाळी  किंवा उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवडीसाठी सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरला जातो त्यावेळेस रोपांना जेव्हा जमिनीमधून पाणी दिले जाते.
✅मल्चिंग पेपर शेतामध्ये टाकताना सिल्व्हर रंग हा वरच्या बाजूला व ब्लॅक  रंग खालच्या बाजूला असतो.त्यावेळेस त्या  सिल्वर बाजूवर सूर्यप्रकाश पडतो,तेव्हा तो सूर्यप्रकाश शोषला जातो व त्यामुळे जमिनीचे तापमान वाढते व जमीन ओली असल्यामुळे त्या ओलाव्याचे बाष्पीभवन होऊन त्याची गरम वाफ तयार होते.निसर्ग नियमानुसार ती गरम वाफ वरच्या दिशेने वाहते व त्या जागी रोपे लावली आहेत त्या होलामधून बाहेर येते व रोपांची पाने जळून जातात व रोपांची मर होते.त्यामुळे हिवाळी किंवा उन्हाळी हंगामात सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग वर टोमॅटो रोपांची लागवड करत असाल तर लागवड करताना कागदी कप वापरावेत. 

टोमॅटो लागवडीसाठी कागदी कप केव्हा वापरावेत?

✅जर हिवाळी किंवा उन्हाळी हंगामात  सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग पेपर वर टोमॅटो रोपांची लागवड करत असाल तर लागवड करताना फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे कागदी कप वापरावेत.