Skip to product information
1 of 1

Adama Myclomain

Adama Myclomain

Adama

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Adama 
उत्पादनाचे नाव Myclomain
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक Myclobutanil 10% WP
रासायनिक गट Triazole  
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही 

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ यामध्ये मायक्लोब्युटानिल 10% डब्ल्यू.पी. (Myclobutanil 10% WP - Wettable Powder) हा रासायनिक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ ट्रायझोल (Triazoles)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)
    ▸ हे आंतरप्रवाही असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर वनस्पतीच्या पानांद्वारे आणि खोडाद्वारे वेगाने आत मध्ये शोषले जाते. हे वनस्पतीच्या झायलम (Xylem) पेशींद्वारे खालून वरच्या दिशेने (Acropetal movement) प्रवास करते, त्यामुळे नवीन येणाऱ्या पालवीलाही संरक्षण मिळते.
    ▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि निर्मूलन (Preventive, Curative & Eradicant)
    ▸ हे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास प्रतिबंधात्मक (Preventive) म्हणून काम करते. तसेच रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वापरल्यास, ते बुरशीची वाढ थांबवून उपचारात्मक (Curative) नियंत्रण देते.
    ▸ टिप: यामधील मायक्लोब्युटानिल मध्ये उत्कृष्ट निर्मूलन (Eradicant action) असते. म्हणजेच बुरशीची वाढ झाली असेल तरीही, हे बुरशीच्या 'एर्गोस्टेरॉल' निर्मितीत अडथळा आणून त्या बुरशीला आणि तिच्या बीजाणूंना नष्ट करू शकते (विशेषतः भुरी रोगामध्ये).

  • कार्यपद्धती

    ▸ मायक्लोब्युटानिल हे 'एर्गोस्टेरॉल निर्मिती अवरोधक' (Sterol Biosynthesis Inhibitor - SBI) गटातील आहे.
    ▸ हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशींच्या संरक्षणासाठी आणि वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या 'एर्गोस्टेरॉल' (Ergosterol) या घटकाची निर्मिती होण्यापासून रोखते. एर्गोस्टेरॉल तयार न झाल्यामुळे बुरशीची पेशीभित्तिका (Cell Membrane) कमकुवत होते आणि तिचे कार्य कोलमडते, ज्यामुळे बुरशीचा नाश होतो.
    ▸ याला 'डी.एम.आय.' (DMI - Demethylation Inhibitor) असेही म्हणतात.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी (Foliar Spray)

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ प्रमाण : 1 ग्रॅम प्रती लीटर

  • कांदा

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज / रोपकुज (Phytophthora spp.)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज / रोपकुज (Phytophthora spp.)
    ▸ डाउनि मिल्ड्यू (Downy mildew – Peronospora parasitica)

  • बटाटा

    ▸ उगवणीतील कुज (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)
    ▸ उशीरा येणारा करपा – Late blight (Phytophthora infestans)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज / कॉलर रॉट (Phytophthora spp.)
    ▸ उशीरा येणारा करपा – Late blight (secondary control)

  • आले,हळद

    ▸ रायझोम कंदकुज
    ▸ कंदकुज

  • टोमॅटो

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज / कॉलर रॉट (Phytophthora spp.)
    ▸ उशीरा येणारा करपा – Late blight (secondary control)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ कॉलर रॉट / मुळकुज (Phytophthora capsici)
    ▸ फाइटोफ्थोरा फळकुज (secondary control)

  • वांगे

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज / कॉलर रॉट (Phytophthora spp.)

  • भेंडी

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • गवार

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • कापूस

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • झेंडू

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • शेवंती

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • सोयाबीन

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • भुईमूग

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • वाल घेवडा 

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • हरभरा

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • वाटाणा

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • भात

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)

  • गहू

    ▸ डाउनि मिल्ड्यू (Downy mildew)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज / कॉलर रॉट (Phytophthora spp.)

  • मका

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Pythium spp.)
    ▸ मुळकुज (Phytophthora spp.)


  • भुरी स्पेशालिस्ट (Powdery Mildew Specialist) – हे विशेषतः भुरी (Powdery Mildew) रोगावर 'रामबाण' मानले जाते. यासोबतच ते स्कॅब (Scab), पानांवरील ठिपके आणि मिरचीमधील डाय-बॅक (Die-back) यावर प्रभावी नियंत्रण देते.
    आंतरप्रवाही क्रिया (Systemic Action) – हे शक्तिशाली आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. फवारणीनंतर हे वनस्पतीच्या आत वेगाने शोषले जाते आणि खालून वरच्या दिशेने (Acropetal) प्रवास करते, त्यामुळे नवीन येणाऱ्या पालवीलाही संरक्षण मिळते.
    उपचारात्मक आणि निर्मूलन (Curative & Eradicant) – हे फक्त प्रतिबंधात्मक नाही, तर रोग आल्यावर बुरशीला मारण्याची (Curative) आणि बुरशीचे बीजाणू पूर्णपणे नष्ट करण्याची (Eradicant) ताकद यामध्ये आहे.
    बाष्प क्रिया (Vapor Action) – यामध्ये काही प्रमाणात 'व्हेपर ॲक्शन' (वाफेद्वारे पसरणे) गुणधर्म आहेत. यामुळे दाट पानांच्या गर्दीत (Canopy) जिथे फवारणी पोहचत नाही, तिथेही बुरशीचे नियंत्रण मिळण्यास मदत होते.
    डब्लू.पी. स्वरूप (WP Formulation) – हे पाण्यात मिसळणारी पावडर (Wettable Powder) स्वरूपात उपलब्ध आहे. हे इतर कीटकनाशकांसोबत मिसळण्यासाठी सुरक्षित आहे.
    पिकासाठी सुरक्षित – शिफारस केलेल्या मात्रेत वापरल्यास हे पिकासाठी सुरक्षित असते आणि फुलोरा अवस्थेतही (उदा. द्राक्ष, मिरची) वापरता येते.

  • 'क्रॉस रेझिस्टन्स' टाळणे (Avoid Cross-Resistance):
    ▸ शास्त्रीय कारण: मायक्लोब्युटानिल हे 'ट्रायझोल' (Triazole - FRAC Group 3) गटातील बुरशीनाशक आहे. या गटातील इतर बुरशीनाशके (उदा. प्रोपिकोनाझोल - टिल्ट, हेक्साकोनाझोल - कोन्टाफ, टेब्युकोनाझोल - फॉलिक्युअर) यांची कार्यपद्धती (DMI) समान आहे. जर बुरशीने मायक्लोब्युटानिल विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार केली, तर ती याच गटातील इतर औषधांनाही दाद देत नाही (Cross Resistance).
    ▸ टीप: जर इंडेक्स/मायक्लोब्युटानिलचा रिझल्ट येत नसेल, तर लगेच त्याचा वापर थांबवा. पुढील फवारणीत 'टिल्ट', 'स्कोअर' किंवा 'फॉलिक्युअर' वापरू नका. त्याऐवजी तात्पुरते या गटाचे वापर बंद करून वेगळ्या गटाचे (उदा. स्ट्रोबिल्युरिन किंवा SDHI) बुरशीनाशक वापरा.

    'मोड ऑफ ॲक्शन' मध्ये बदल (Rotate Mode of Action):
    ▸ शास्त्रीय कारण: हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशीमधील 'एर्गोस्टेरॉल' (Ergosterol Biosynthesis) निर्मितीत एका विशिष्ट ठिकाणी अडथळा आणते. सतत एकाच प्रकारचे औषध वापरल्यास बुरशी जनुकांमध्ये (Genes) बदल करून याला विरोध करते.
    ▸ टीप: साखळी तोडण्यासाठी, पुढील फवारणीत 'स्ट्रोबिल्युरिन' (गट ११ - उदा. अमिस्टार) किंवा 'मल्टी साईट' (उदा. गंधक/Sulphur, M-45) बुरशीनाशक वापरावे. विशेषतः भुरी रोगासाठी गंधक (Sulphur) हे रोटेशनसाठी उत्तम आहे.

    'टँक मिक्स' धोरण (Tank Mix Strategy - Multi-site Action):
    ▸ शास्त्रीय कारण: मायक्लोब्युटानिल हे 'सिंगल साईट' (Single Site) बुरशीनाशक असल्याने, वारंवार वापरल्यास रेझिस्टन्सचा धोका (Medium Risk) असतो. मल्टी-साईट बुरशीनाशके बुरशीवर अनेक ठिकाणांवरून एकाच वेळी कार्य करतात.
    ▸ टीप: हे बुरशीनाशक शक्यतो एकटे (Solo) वापरण्यापेक्षा, भुरी रोगासाठी विद्राव्य गंधक (Wettable Sulphur) आणि इतर रोगांसाठी मॅन्कोझेब (M-45) किंवा झिनेब सोबत मिसळून वापरणे जास्त सुरक्षित आणि प्रभावी ठरते.

    वापराची वारंवारता (Frequency of Application):
    ▸ नियम: एका पिकाच्या हंगामात (Crop Season) हे बुरशीनाशक जास्तीत जास्त २ ते ३ वेळाच वापरावे.
    ▸ टीप: सलग (Back to back) दोन मायक्लोब्युटानिलच्या फवारण्या कधीही घेऊ नयेत. दोन फवारण्यांच्या मध्ये किमान एक स्पर्शजन्य (उदा. गंधक किंवा M-45) फवारणी घ्यावी.

    उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):
    ▸ शास्त्रीय कारण: जरी मायक्लोब्युटानिलमध्ये 'क्युरेटिव्ह' (Curative - रोग आल्यावर मारणे) गुणधर्म उत्कृष्ट असले, तरी रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढल्यावर (Heavy Infestation) फक्त याच्यावर अवलंबून राहिल्यास 'रेझिस्टन्स' लवकर येतो.
    ▸ टीप: भुरी (Powdery Mildew) किंवा करपा दिसण्याची वाट पाहू नका. प्राथमिक लक्षणे दिसताच फवारणी करा. जर रोग खूप वाढला असेल, तर फक्त मायक्लोब्युटानिल न वापरता त्यासोबत स्पर्शजन्य बुरशीनाशक नक्की घ्या.

    जैविक बुरशीनाशकांचा वापर (Use of Bio-fungicides):
    ▸ शास्त्रीय कारण: रासायनिक ट्रायझोलच्या सततच्या माऱ्यामुळे बुरशीची प्रतिकारशक्ती वाढते. जैविक घटकांची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी असते.
    ▸ टीप: रासायनिक साखळी तोडण्यासाठी मधल्या काळात 'बॅसिलस सबटिलिस' (Bacillus subtilis) किंवा भुरीसाठी 'अँपेलोमायसेस क्विस्कवालिस' (Ampelomyces quisqualis) या जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

    योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):
    ▸ शास्त्रीय कारण: कमी डोस वापरल्यास बुरशीवर 'निवड दबाव' (Selection Pressure) कमी पडतो आणि औषधाला दाद न देणारी बुरशी जिवंत राहते.
    ▸ टीप: नेहमी शिफारस केलेला डोस (साधारण ०.५ ते १ ग्रॅम प्रति लिटर, पिकानुसार बदलते) तंतोतंत वापरावा. भुरी पानाच्या खालच्या बाजूला असते, त्यामुळे फवारणी करताना पूर्ण झाड भिजेल असे कव्हरेज घ्यावे.