Skip to product information
1 of 1

Adama Custodia

Adama Custodia

Adama

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Adama
उत्पादनाचे नाव Custodia
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक Azoxystrobin 11%+ Tebuconazole 18.3% W/W SC
रासायनिक गट Strobilurin +
Triazole 
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही  

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ यामध्ये अझॉक्सिस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनॅझोल 18.3% एस.सी. (Azoxystrobin 11% + Tebuconazole 18.3% w/w SC) हे दोन रासायनिक घटक असतात.

  • रासायनिक गट

    ▸ स्ट्रोबिल्यूरिन + ट्रायझोल्स (Strobilurins + Trizoles)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)

    ▸ यामधील दोन्ही बुरशीनाशक घटक (अझॉक्सिस्ट्रोबिन आणि टेब्युकोनॅझोल) हे आंतरप्रवाही असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आत मध्ये शोषले जाते व वनस्पतींच्या झायलम (Xylem) पेशींच्याद्वारे सर्व भागात (खालून वरच्या दिशेने) पोहचते.

    ▸ यामधील अझॉक्सिस्ट्रोबिन हे ट्रान्सलॅमिनर (Translaminar) गुणधर्माचे असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर ते पानांच्या वरच्या भागाद्वारे शोषले जाते व पानांच्या खालच्या बाजूला झिरपते. यामुळे पानाच्या दोन्ही बाजूला बुरशीजन्य रोगापासून संरक्षण देते.

    ▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि निर्मूलन (Preventive, Curative & Eradicant)

    ▸ बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास प्रतिबंधात्मक (Preventive) आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीस उपचारात्मक (Curative) नियंत्रण देते. टेब्युकोनॅझोलमुळे रोगाचा प्रसार थांबण्यास आणि बुरशी नष्ट होण्यास मदत होते.

    ▸ टिप : कस्टोडिया (Custodia) मध्ये टेब्युकोनॅझोल असल्यामुळे यामध्ये निर्मूलन (Eradicant action) करण्याचे गुणधर्म अझॉक्सिस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एस.सी. च्या तुलनेत थोडे जास्त असतात. म्हणजेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल, तर हे बुरशीला मारून टाकते (Anti-sporulant). तरीही, अत्यंत जास्त प्रादुर्भाव (Severe Infestation) असल्यास, १००% नियंत्रणासाठी यासोबत स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर करणे योग्य ठरते.

  • कार्यपद्धती

    ▸ अझॉक्सिस्ट्रोबिन (Azoxystrobin) हे श्वसनक्रिया अवरोधक (Respiration Inhibitor) गटातील बुरशीनाशक आहे.
    ▸ हे बुरशीनाशक बुरशीच्या मायटोकॉन्ड्रिया मधील श्वसनसाखळी (Electron Transport Chain) मध्ये अडथळा आणते. विशेषतः सायटोक्रोम bc₁ कॉम्प्लेक्सच्या Qo साइटवर क्रिया करून इलेक्ट्रॉन वहन थांबवते. परिणामी बुरशीच्या पेशींमध्ये ATP (ऊर्जा) निर्मिती होत नाही, पेशींना ऊर्जा मिळत नाही आणि बुरशीची वाढ व प्रसार थांबतो. याला क्विनोन आउटसाइड इनहिबिटर (QoI fungicide) असे म्हणतात.

    ▸ टेब्युकोनॅझोल (Tebuconazole) हे एर्गोस्ट्रॉल जैवरासायनिक संश्लेषण अवरोधक (Ergosterol Biosynthesis Inhibitor – EBI) किंवा डिमेथिलेशन इनहिबिटर (DMI) गटातील बुरशीनाशक आहे.
    ▸ टेब्युकोनॅझोल हे सायटोक्रोम P450-आश्रित 14α-डेमिथायलेज (CYP51) या एन्झाइमच्या कार्यामध्ये अडथळा आणते, जो लॅनोस्टेरॉल (Lanosterol) चे एर्गोस्टेरॉल (Ergosterol) मध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असतो.
    ▸ या अडथळ्यामुळे बुरशीच्या पेशींची पडदा रचना (Cell membrane structure) व कार्य बिघडते, पेशी विभाजन थांबते आणि परिणामी बुरशीची वाढ रोखली जाते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी (Foliar Spray)

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ प्रमाण : 1 ml प्रति लिटर पाणी (पिकानुसार बदलते)

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (Primary – Preventive + Early Curative)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
    ▸ भुरी (Secondary)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ सेप्टोरिया पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ भुरी (Secondary)
    ❌ फुजारियम रोपमर – मर्यादित / unreliable

  • बटाटा

    ▸ लवकर येणारा करपा (Early blight) (Primary)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
    ❌ ब्लॅक स्कर्फ / कंदकुज – योग्य नाही

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
    ▸ भुरी (Primary–Secondary दोन्ही)
    ❌ फुजारियम रोपमर – strong नाही

  • आले,हळद

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
    ❌ रायझोम / कंदकुज – योग्य नाही

  • टोमॅटो

    ▸ लवकर येणारा करपा (Primary)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ अँथ्रॅकोज करपा (Early stage)
    ▸ भुरी (Secondary)
    ❌ फुजारियम रोपमर – मर्यादित

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ भुरी (Secondary)
    ❌ कॉलर रॉट – योग्य नाही

  • वांगे

    ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ भुरी (Secondary)

  • भेंडी

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ भुरी (Secondary)

  • गवार

    ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
    ▸ भुरी (Secondary)

  • कापूस

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
    ▸ भुरी (Secondary)
    ❌ फुजारियम / कॉलर रॉट – योग्य नाही

  • झेंडू

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
    ▸ फुलकुज (Secondary)

  • शेवंती

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
    ▸ फुलकुज (Secondary)

  • सोयाबीन

    ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
    ▸ सेप्टोरिया तपकिरी ठिपके (Primary)
    ▸ रस्ट (Secondary)

  • भुईमूग

    ▸ उशिरा येणारे ठिपके (Late leaf spot – Primary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
    ▸ रस्ट (Secondary)

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
    ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
    ▸ अल्टरनेरीया ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
    ▸ रस्ट (Secondary)

  • हरभरा

    ▸ अल्टरनेरीया ठिपके (Primary)
    ▸ रस्ट (Secondary)
    ❌ फुजारियम मुळकुज – योग्य नाही

  • वाटाणा

    ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
    ▸ अल्टरनेरीया ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
    ▸ भुरी (Primary)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
    ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
    ▸ भुरी (Primary)
    ❌ फुजारियम रोपकुज – मर्यादित

  • भात

    ▸ तपकिरी ठिपके (Brown spot – Primary)
    ▸ शीथ रॉट (Secondary)
    ❌ ब्लास्ट – मर्यादित

  • गहू

    ▸ पानांवरील ठिपके (Leaf blight complex)
    ▸ सेप्टोरिया ठिपके (Primary)
    ▸ रस्ट (Primary–Secondary)

  • मका

    ▸ पानांवरील ठिपके (Leaf spot complex)
    ▸ रस्ट (Secondary)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
    ▸ अल्टरनेरीया ठिपके (Primary)
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके (Primary)
    ▸ रस्ट (Secondary)
    ▸ भुरी (Secondary)

  • ▸ Mode of Entry: सिस्टमॅटिक + ट्रान्सलामिनार + संपर्क — पानात शोषून आतून व बाहेरून पूर्ण संरक्षण.

    ▸ परिणाम किती दिवस टिकतो: या बुरशीनाशकाचा परिणाम १०–१४ दिवस टिकतो.

    ▸ दोन घटकांचा फायदा:  एकत्र आल्याने दुप्पट परिणाम, जलद आणि दीर्घकाळ रोग नियंत्रण.

    ▸ प्रतिबंधात्मक + उपचारात्मक+संपूर्ण निर्मूलन : रोग येण्याआधी थांबवते, आणि प्रारंभिक प्रादुर्भाव दिसल्यानंतर पसरणे रोखते.

    ▸ फायटोटॉनिक इफेक्ट: पाने हिरवी होतात, प्रकाश संशलेशन व इतर प्रक्रिया सुधारते व उत्पादनात सुधारणा होते.

    ▸ SC फॉर्म : द्रव स्वरूप — पाण्यात सहज मिसळते, वापरणे सोपे व परिणाम दीर्घकाळ टिकतात.

  • 'क्रॉस रेझिस्टन्स' टाळणे (Avoid Cross-Resistance):
    ▸ शास्त्रीय कारण: यामध्ये दोन गट आहेत - ग्रुप ११ (अझॉक्सिस्ट्रोबिन) आणि ग्रुप ३ (टेब्युकोनॅझोल). जर तुम्ही याची फवारणी केली असेल, तर त्यानंतर लगेच पुन्हा 'स्ट्रोबिल्युरिन' (उदा. कॅब्रिओ टॉप, नॅटिव्हो) किंवा 'ट्रायझोल' (उदा. स्कोअर, टिल्ट, फॉलिकूर) गटातील बुरशीनाशक वापरू नका. कारण बुरशीने या बुरशीनाशकला विरोध केला तर ती याच गटातील दुसऱ्या बुरशीनाशकला दाद देणार नाही.
    ▸ टीप: साखळी तोडण्यासाठी, या फवारणीनंतर पुढील फवारणीत संपूर्णपणे वेगळ्या गटाचे बुरशीनाशक वापरा.

    'मोड ऑफ ॲक्शन' मध्ये बदल (Rotate Mode of Action):
    ▸ शास्त्रीय कारण: हे संयुक्त बुरशीनाशक असले तरी, यातील दोन्ही घटक 'सिंगल साईट' (Single Site) आहेत. म्हणजे ते बुरशीच्या एका विशिष्ट जागेवर हल्ला करतात. सतत हेच वापरल्यास बुरशीला त्या जागेचे संरक्षण करणे सोपे जाते.
    ▸ टीप: या बुरशीनाशकच्या फवारणीनंतर पुढील फवारणीत 'मल्टी-साईट' (Multi-site) बुरशीनाशकाचा वापर करणे बंधनकारक समजावे. उदा. मॅन्कोझेब (M-45), क्लोरोथॅलोनिल (कवच) किंवा कॉपर (ब्लायटॉक्स). यामुळे राहिलेली बुरशी नष्ट होते.

    वापराची वारंवारता (Frequency of Application):
    ▸ नियम: एका पिकाच्या हंगामात (Crop Season) हे संयुक्त बुरशीनाशक जास्तीत जास्त २ वेळा वापरावे.
    ▸ टीप: सलग (Sequential) दोन फवारण्या कधीही घेऊ नयेत. उदाहरणार्थ: १ली फवारणी: कस्टोडिया -> २री फवारणी: M-45 किंवा कवच -> ३री फवारणी: कस्टोडिया (गरज असल्यास).

    उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):
    ▸ शास्त्रीय कारण: जरी यात 'टेब्युकोनॅझोल' असल्यामुळे हे रोग आल्यावर (Curative) चालत असले, तरी 'अझॉक्सिस्ट्रोबिन' हे प्रतिबंधात्मक (Preventive) म्हणून जास्त ताकदीने काम करते. जास्त बुरशी असताना वापरल्यास रेझिस्टन्स येण्याची भीती वाढते.
    ▸ टीप: याचा वापर रोगाची पहिली लक्षणे दिसताच किंवा रोग येण्यापूर्वीच (उदा. ढगाळ वातावरण किंवा पावसाळी हवामान असताना) केल्यास सर्वोत्तम रिझल्ट मिळतो आणि बुरशीनाशक वाया जात नाही.

    योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):
    ▸ शास्त्रीय कारण: संयुक्त बुरशीनाशकांमध्ये जर डोस कमी पडला, तर दोनपैकी एका घटकाचा प्रभाव कमी होतो आणि बुरशी त्या घटकाला पचवायला शिकते (Sub-lethal dose effect).
    ▸ टीप: नेहमी शिफारस केलेला डोस (साधारण १ ते १.२५ मि.ली. प्रति लिटर पाणी) वापरावा. फवारणी करताना झाडाच्या आतपर्यंत बुरशीनाशक जाईल याची काळजी घ्यावी.