टोमॅटो बांधणीसाठी विविध प्रकारची दोरी वापरली जाते.ज्यामध्ये खालील प्रकार आहेत.
सुतळी
✅जेव्हापासून टोमॅटो लागवड केली जाते तेव्हापासून रोपांच्या बांधणीसाठी सुतळीचा वापर केला जातो.सुतळी निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.सुतळी ही कमी जाडीची असावी, कारण सुतळी खरेदी करताना हि वजनावर केली जाते.त्यामुळे कमी जाडीच्या सुतळीचे वजन हे कमी असते व एका किलोमध्ये जास्त सुतळ्या बसतात. त्याउलट जास्त जाडीच्या सुतळीचे वजन हे जास्त असते त्यामुळे त्यात कमी सुतळ्या बसतात.सुतळीने बांधणी केल्यामुळे रोपांना इजा होत नाही.तसेच सुतळीचे जीवनकाळ हे एक टोमॅटो हंगामा एवढे असते.टोमॅटो बांधणीसाठी वापरली जाणारी सुतळी ही दोन धाग्यांची असते.
नायलॉन धागा
✅आत्ताच्या दोन-तीन वर्षात टोमॅटो बांधणीसाठी नायलॉन धागा वापरला जात आहे. या धाग्याचा खर्च हा सुतळीपेक्षा कमी आहे. नायलॉन दोरीची जाडी हि सुतळीच्या जाडीपेक्षा कमी असते.नायलॉनचा वापर करताना जर त्याची गाठ घट्ट मारली तर त्या ठिकाणी जखम होऊ शकते व त्या जखमेमधून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी नायलॉन दोरीने बांधणी करताना लूज बांधणी करावी. सूती धागा ✅सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी सुतळी,नायलॉन धागा व्यतिरिक्त सुती धागा वापरत आहेत. हा धागा सुतळी किंवा नायलॉन पेक्षा चांगला पर्याय आहे. अशा प्रकारे टोमॅटो बांधणी करताना योग्य प्रकारच्या धाग्यांची निवड करावी