टोमॅटो रोपांचे खोड जाड होण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात?

टोमॅटो रोपांचे खोड जाडीचे महत्त्व 

✅टोमॅटो रोपवाढीच्या अवस्थेत रोपांचे खोड हे आकाराने जाड होत असते.रोपांचे खोड जाड असेल तर रोपांचे निघणारे फुटवे हे संख्येने जास्त व आकाराने झाड निघतात,त्या फुटव्यांना निघणाऱ्या फांद्या सुद्धा जाड व संख्येने जास्त निघतात,ज्यामुळे रोपांना फुले जास्त व चांगल्या गुणवत्तेची येतात, ज्यामुळे रोपांची फुलगळ होत नाही.

टोमॅटो रोपांचे खोड जाड करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कधी व कोणत्या कराव्यात?

पाणी नियोजन 

✅टोमॅटो रोपवाढीच्या अवस्थेत रोपांचे खोड जाड होण्यासाठी योग्य प्रकारे पाणी नियोजन करणे गरजेचे आहे. जर जास्त प्रमाणात पाणी दिले तर रोपांची वाढ जास्त होईल व खोड पातळ होईल.

मुळांची वाढ

✅टोमॅटो रोपांच्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे झाली असेल तर आवश्यक अन्नद्रव्ये मुळांद्वारे शोषित केली जातात व त्यामुळे रोपवाढीच्या अवस्थेत खोडाचा आकार जाड होतो.

रोपांची निवड

✅योग्य  प्रकारच्या रोपांची निवड हि रोपांच्या खोडांच्या जाडीवर परिणाम करते.त्यासाठी 70 च्या ट्रे मधील रोपे लागवडीसाठी वापरावीत.जास्त उंचीची व जास्त वयाची रोपे लागवडीसाठी वापरू नयेत.
रोपांची निवड कशा प्रकारे करावी याची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

योग्य प्रकारे खत नियोजन 

✅टोमॅटो रोपवाढीच्या अवस्थेत मातीच्या प्रकारानुसार वातावरणानुसार योग्य प्रकारे खत नियोजन करावे.
✅नायट्रोजन युक्त खतांचा वापर मर्यादित करावा.तसेच फॉस्फरस व पोटॅश युक्त खतांचा वापर संतुलित पद्धतीने करावा जेणेकरून मुळांची वाढ होईल व अन्नद्रव्ये शोषण चांगल्या प्रकारे केले जाईल याचा थेट परिणाम रोपांच्या संपूर्णपणे वाढीवर व विकासावर होईल.
✅कॅल्शियम युक्त खतांचा वापर करणे - ठिबकद्वारे व फवारणीद्वारे कॅल्शियम युक्त खतांचा वापर करा, कारण कॅल्शियम या अवस्थेत खोडामध्ये साठवला जातो व खोडाचा आकार वाढतो.
अशा प्रकारे विविध उपाययोजना करून खोडाचा आकार वाढवू शकतो.