UPL Saaf
UPL Saaf
UPL
Out of stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇
- मोफत घरपोच सेवा
- मार्केट पेक्षा कमी दर
- जलद घरपोच सेवा
Share

पर्यायी उत्पादने
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ यामध्ये मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यू.पी.(Mancozeb 63% + Carbendazim 12% WP)Wettable Powder हे दोन रासायनिक घटक असतात.
-
रासायनिक गट
▸डायथिओकार्बामेट्स + बेंझीमिडाझोल्स
(Dithiocarbamates + Benzimidazoles) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact)
▸ यामधील कार्बेन्डाझिम (Carbendazim) हे आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक असल्यामुळे,
फवारणी केल्यानंतर पानांच्या पृष्ठभागावरून शोषले जाते व वनस्पतींच्या झायलम पेशींच्याद्वारे वरच्या दिशेने वहन करून वनस्पतीच्या विविध भागांपर्यंत पोहोचते.
▸ यामधील मॅन्कोझेब (Mancozeb) हे संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असल्यामुळे, ते पानांच्या पृष्ठभागावर संरक्षक असा रासायनिक थर तयार करते आणि बुरशीचे बीजाणू अंकुरण्यापासून (spore germination) रोखते.
👉 Indofil Sprint मध्ये Translaminar क्रिया नाही.
▸ क्रिया प्रकार: प्रामुख्याने प्रतिबंधात्मक (Preventive) + मर्यादित उपचारात्मक (Early Curative)
▸ बुरशीन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास,मॅन्कोझेबमुळे प्रभावी प्रतिबंधात्मक संरक्षण मिळते.
▸ बुरशीन्य रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसताच वापरल्यास,कार्बेन्डाझिममुळे मर्यादित उपचारात्मक नियंत्रण मिळते.
▸ टीप (खूप महत्त्वाची): यामधील Carbendazim (FRAC-1) मध्ये पूर्ण निर्मूलन (Eradicant action) नसते.म्हणजेच बुरशीन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढल्यानंतर किंवा रोग जुना झाल्यानंतर👉 Indofil Sprint बुरशी पूर्णपणे नष्ट करू शकत नाही.अशा वेळी Triazole / Strobilurin / SDHI गटातील बुरशीनाशकांची गरज भासते. -
कार्यपद्धती
▸मॅन्कोझेब (Mancozeb ) हे संपर्कजन्य (Contact) बहु-स्थळी क्रिया करणारे (Multi-site action) बुरशीनाशक आहे.
▸ मॅन्कोझेब बुरशीच्या पेशींमध्ये असलेल्यासल्फहायड्रिल (–SH) गट असलेल्या एंजाइम्सशी संयोग करून त्यांचे कार्य बंद करते.परिणामी बुरशीच्या महत्त्वाच्या चयापचय प्रक्रिया (Metabolic processes)जसे की श्वसन, प्रथिन संश्लेषण, पेशी विभाजन यावर परिणाम होतो,बुरशीचे बीजाणू अंकुरणे (Spore germination) थांबते.
👉 म्हणून मॅन्कोझेब मुख्यतः प्रतिबंधात्मक (Preventive) क्रिया करते.
▸कार्बेन्डाझिम हे आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक आहे.
▸ कार्बेन्डाझिम बुरशीच्या पेशींमधील β-ट्युब्युलिन (β-tubulin) प्रथिनाशी संयोग करून मायटोसिस (पेशी विभाजन) प्रक्रियेत अडथळा आणते.परिणामी स्पिंडल फायबर (Spindle formation) तयार होत नाही,पेशी विभाजन थांबते व परिणामी बुरशीची वाढ रोखली जाते
👉 म्हणून कार्बेन्डाझिम उपचारात्मक (Curative) – पण फक्त सुरुवातीच्या अवस्थेत प्रभावी असते.
▸ Mancozeb (M03) → बहु-स्थळी, contact, resistance कमी
▸ Carbendazim (FRAC-1) → systemic, single-site, early curative
👉 दोन्ही एकत्र आल्यामुळे प्रतिबंधात्मक + मर्यादित उपचारात्मक नियंत्रण -
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी,आळवणी,ठिबक,बीजप्रक्रिया
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी : 2 ते 2.5 ग्रॅम प्रती लीटर
▸आळवणीसाठी : 2 ते 2.5 ग्रॅम प्रती लीटर
▸ ठिबकसाठी : 1 kg प्रती एकर
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग/किडी
-
कांदा
▸ जांभळा करपा (Purple blotch)
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ मुळकुज (Fusarium – सुरुवातीस) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सेप्टोरिया पानांवरील ठिपके
▸ फुजारियम रोपमर (प्रारंभिक) -
बटाटा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ फुजारियम रोपमर (प्रारंभिक) -
आले,हळद
▸ रायझोम कंदकुज
▸अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ कंदकुज -
टोमॅटो
▸फुजारियम रोपमर
▸अँथ्रॅकोज करपा
▸ लवकर येणारा करपा
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
▸अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ लवकर येणारा करपा -
मिरची,ढोबळी मिरची
▸अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
▸कॉलर रॉट (बुडकुज)
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके -
वांगे
▸ फुजारियम रोपमर
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ कॉलर रॉट (बुडकुज) -
भेंडी
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके -
गवार
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके -
कापूस
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ फुजारियम रोपमर (प्रारंभिक) -
झेंडू
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ फुजारियम मर
▸ फुलकुज -
शेवंती
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ फुजारियम मर
▸ फुलकुज -
सोयाबीन
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ सेप्टोरिया तपकिरी ठिपके -
भुईमूग
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ उशिरा येणारे ठिपके -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ फुजारियम मुळकुज -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनेरीया ठिपके
▸ सारकोस्पोरा ठिपके
▸ फुजारियम मुळकुज
▸ फुजारियम बियाणे कुज -
हरभरा
▸ फुजारियम मुळकुज
▸ अल्टरनेरीया ठिपके
▸ बियाणे कुज -
वाटाणा
▸अल्टरनेरीया पानांवरील ठिपके
▸सारकोस्पोरा ठिपके
▸फुजारियम रोपकुज
▸ कॉलर रॉट -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸अल्टरनेरीया पानांवरील ठिपके
▸सारकोस्पोरा ठिपके
▸फुजारियम रोपकुज
▸ कॉलर रॉट -
भात
▸तपकिरे ठिपके
▸रोपकुज
▸कणीस कुज
▸शीत रॉट -
गहू
▸सरकोस्पोरा ठिपके
▸सेप्टोरीया ठिपके
▸पानांवरील ठिपके
▸अल्टरनेरीया ठिपके
▸फुजारियम मुळकुज
▸उगवणीतील कुज -
मका
▸पानांवरील तपकिरी ठिपके
▸फुजारियम खोडकुज
▸फुजारियम मुळकुज -
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸ विस्तृत श्रेणीतील नियंत्रण (Broad Spectrum Control) – हे करपा (Anthracnose), भुरी (Powdery Mildew), पानावरील ठिपके, फळकूज यासह केवडा (Downy Mildew) आणि तांबेरा (Rust) यांसारख्या जवळपास सर्वच प्रमुख बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवते.
▸ स्पर्शजन्य व आंतरप्रवाही क्रिया (Contact & Systemic Action) – हे एक संयुक्त बुरशीनाशक आहे. यातील 'मॅन्कोझेब' पानांच्या पृष्ठभागावर राहून (Contact) रोगाला रोखते, तर 'कार्बेन्डाझिम' पानांवाटे आणि मुळांवाटे शोषले जाऊन (Systemic) पिकाच्या आतून रोगाचा सामना करते.
▸ दुहेरी कार्यपद्धती (Preventive & Curative) – हे प्रतिबंधात्मक (रोग येण्याआधी) आणि उपचारात्मक (रोग आल्यानंतर) अशा दोन्ही प्रकारे उत्कृष्ट काम करते. दुहेरी हल्ल्यामुळे बुरशीवर जलद आणि खात्रीशीर नियंत्रण मिळते.
▸ पिकाचा आरोग्य परिणाम (Phytotonic Effect) – यामध्ये मॅन्गेनीज (Mn) आणि झिंक (Zn) हे सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असल्यामुळे, फवारणीनंतर पिकावर गडद हिरवेपणा (Greening Effect) येतो आणि पीक तजेलदार दिसते.
▸ WP स्वरूप (Wettable Powder) – हे पाण्यात पूर्णपणे मिसळणाऱ्या पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. हे फवारणी (Spraying), आळवणी (Drenching) आणि बीजप्रक्रियेसाठी (Seed Treatment) अत्यंत सोपे आणि उपयुक्त आहे.
▸ प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management) – यामध्ये दोन भिन्न कार्यपद्धतीचे घटक एकत्र असल्यामुळे, बुरशीमध्ये या बुरशीनाशक विरुद्ध प्रतिकारशक्ती (Resistance) लवकर तयार होत नाही, ज्यामुळे हे दीर्घकाळ प्रभावी राहते.
-
'क्रॉस रेझिस्टन्स' टाळणे (Avoid Cross-Resistance):
▸ शास्त्रीय कारण: या संयुक्त बुरशीनाशकात १२% 'कार्बेन्डाझिम' (Carbendazim) आहे. तसेच 'थिओफेनेट मिथाइल' (रोको) चे रूपांतर सुद्धा झाडात गेल्यावर कार्बेन्डाझिम मध्येच होते. त्यामुळे हे बुरशीनाशक, रोको आणि बाविस्टिन हे तिन्ही FRAC गट १ (Group 1) शी संबंधित आहेत.
▸ टीप: जर तुम्ही मागील फवारणीत 'रोको' (Thiophanate Methyl) किंवा 'बाविस्टिन' वापरले असेल, तर लगेच त्यानंतरच्या फवारणीत हे औषध (Saaf/Sixer) वापरू नका. त्याऐवजी ट्रायझोल किंवा स्ट्रोबिल्युरिन गटाचे औषध वापरा.
'मोड ऑफ ॲक्शन' मध्ये बदल (Rotate Mode of Action):
▸ शास्त्रीय कारण: जरी यात स्पर्शजन्य औषध (मॅन्कोझेब) असले, तरी यातील आंतरप्रवाही घटक (कार्बेन्डाझिम) हा बुरशीच्या पेशी विभाजनातील 'बीटा-ट्युबुलिन' प्रक्रियेत अडथळा आणतो. सतत हेच औषध वापरल्यास बुरशीचा अंतर्गत रेझिस्टन्स वाढू शकतो.
▸ टीप: साखळी तोडण्यासाठी, या फवारणीनंतर पुढील फवारणीत 'टेब्युकोनॅझोल' (Tebuconazole), 'प्रोपिकोनॅझोल' (Propiconazole) किंवा 'ॲझॉक्सिस्ट्रोबिन' (Azoxystrobin) यांसारख्या वेगळ्या कार्यपद्धतीच्या बुरशीनाशक वापर करावा.
'रेडी-मिक्स' फायदा (Ready-Mix Strategy - Dual Action):
▸ शास्त्रीय कारण: हे बुरशीनाशक स्वतःच एक 'रेझिस्टन्स मॅनेजमेंट टूल' आहे. कारण यात 'मॅन्कोझेब' (मल्टी साईट - गट M3) आणि 'कार्बेन्डाझिम' (सिंगल साईट - गट 1) एकत्र आहेत. मॅन्कोझेब बुरशीवर अनेक ठिकाणी हल्ला करते, ज्यामुळे कार्बेन्डाझिम विरुद्ध रेझिस्टन्स तयार होण्याचा वेग मंदावतो.
▸ टीप: हे बुरशीनाशक वापरताना तुम्हाला यात वेगळे स्पर्शजन्य बुरशीनाशक मिसळण्याची गरज नाही. हे एक 'संपूर्ण पॅकेज' आहे, जे सिंगल बुरशीनाशक पेक्षा जास्त सुरक्षित आहे.
वापराची वारंवारता (Frequency of Application):
▸ नियम: एका पिकाच्या हंगामात (Crop Season) हे संयुक्त बुरशीनाशक जास्तीत जास्त ३ वेळा वापरावे.
▸ टीप: सलग (Back to back) दोन फवारण्यांनंतर तिसऱ्या फवारणीला नक्कीच बुरशीनाशक बदलावे. प्रत्येक वेळी हेच बुरशीनाशक वापरणे टाळावे.
उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):
▸ शास्त्रीय कारण: यातील 'मॅन्कोझेब' हे घटक रोग येण्याआधी (Preventive) उत्कृष्ट काम करते, तर 'कार्बेन्डाझिम' रोग आल्यावर (Curative) काम करते. पण बुरशीचा प्रादुर्भाव खूप जास्त झाल्यावर कोणतीही आंतरप्रवाही बुरशीनाके प्रभावी निर्मूलन करू शकत नाहीत.
▸ टीप: हे बुरशीनाशक ढगाळ वातावरण असताना किंवा रोगाची सौम्य लक्षणे दिसताच (सुरुवातीच्या काळात) वापरल्यास १००% रिझल्ट मिळतो आणि रेझिस्टन्सचा धोका कमी होतो.
योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):
▸ शास्त्रीय कारण: संयुक्त बुरशीनाशकात जर डोस कमी पडला, तर त्यातील आंतरप्रवाही घटक (Systemic Part) कमकुवत ठरतो आणि बुरशी त्याला दाद देईनाशी होते.
▸ टीप: नेहमी शिफारस केलेला डोस वापरावा. कमी डोस घेऊ नका आणि जास्त डोस घेतल्यास पिकावर 'स्कॉर्चिंग' (पाने जळणे) येऊ शकते, त्यामुळे योग्य डोसच ठेवावा.