UPL Argyle

UPL Argyle

UPL

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव UPL 
उत्पादनाचे नाव Argyle
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Acetamiprid 25% +
Bifenthrin 25% WG
रासायनिक गट
Neonicotinoids +
Pyrethroids
कीटकनाशक प्रकारआंतरप्रवाही +
स्पर्शजन्य

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये ॲसेटामिप्रिड २५% + बायफेन्थ्रिन २५% डब्ल्यू.जी. (Acetamiprid 25% + Bifenthrin 25% WG) हे रासायनिक घटक असतात. जो WG स्वरूपात असतो. WG म्हणजे पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूप (Water Dispersible Granules) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) आणि सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स (Synthetic Pyrethroids) या दोन रासायनिक गटांचे मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक संयुक्त (Combination) रासायनिक आंतरप्रवाही (Systemic) आणि स्पर्शजन्य कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात किंवा पाने खातात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे दुहेरी पद्धतीने कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. ॲसेटामिप्रिड निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सना (nAChR) बांधले जाते, तर बायफेन्थ्रिन सोडियम चॅनेलमध्ये अडथळा निर्माण करते. यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन विस्कळीत होऊन कीटकाला त्वरित अर्धांगवायू होतो आणि त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : ०.५ ते १ ग्रॅम प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : १०० ते १६० ग्रॅम प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरा कूस अळी (DBM)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे

  • बटाटा

    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ पांढरी माशी (Whitefly)
    ▸ फळातील माशी (Fruit Fly - अंशतः)
    ▸ तांबड्या भुंगेरा (Red Pumpkin Beetle)

  • आले,हळद

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ कंदमाशी (Rhizome Fly - प्रतिबंधात्मक)

  • टोमॅटो

    ▸ पांढरी माशी
    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ चुरडा-मुरडा (Thrips & Mites)
    ▸ मावा
    ▸ पांढरी माशी

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे
    ▸ पांढरी माशी

  • भेंडी

    ▸ तुडतुडे
    ▸ मावा
    ▸ फळ पोखरणारी अळी

  • गवार

    ▸ तुडतुडे
    ▸ फुलकिडे

  • कापूस

    ▸ पांढरी माशी
    ▸ तुडतुडे
    ▸ मावा
    ▸ फुलकिडे
    ▸ बोंड अळी (प्रतिबंधात्मक)

  • झेंडू

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा

  • शेवंती

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा

  • सोयाबीन

    ▸ तुडतुडे
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ चक्रभुंगा (Girdle Beetle)

  • भुईमूग

    ▸ तुडतुडे
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ चक्रभुंगा (Girdle Beetle)

  • वाल घेवडा 

    ▸ मावा
    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ मावा
    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • हरभरा

    ▸ मावा
    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • वाटाणा

    ▸ मावा
    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ पांढरी माशी
    ▸ फुलकिडे
    ▸ मावा

  • भात

    ▸ तुडतुडे (BPH/GLH)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • गहू

  • मका

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm - सुरुवातीची अवस्था)
    ▸ मावा

  • फ्रेंच बिन्स

  • ▸बहुविध कीड नियंत्रण: हे पांढरी माशी, तुडतुडे, मावा आणि विविध प्रकारच्या अळ्या (उदा. बोंड अळी) यांवर एकाच वेळी प्रभावी नियंत्रण मिळवून देते.
    ▸उत्कृष्ट नॉक-डाऊन परिणाम: स्पर्शजन्य गुणामुळे हे किडीच्या संपर्कात येताच तिला त्वरित नष्ट करण्यास सुरुवात करते.
    ▸दीर्घकाळ संरक्षण: आंतरप्रवाही गुणधर्मामुळे हे झाडाच्या संपूर्ण भागात पसरते आणि किडींपासून दीर्घकाळ संरक्षण देते.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे कपाशी, मिरची आणि भाजीपाला पिकांवरील जटिल कीड समस्यांसाठी अत्यंत प्रभावी आहे.
    ▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.


  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): अर्गाईल हे Group 4A आणि Group 3A चे मिश्रण आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता चिकट सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ ते ३ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्या आणि माशांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा जलाशय जवळ असताना फवारणी टाळावी.