Tata Manik
Tata Manik
Tata Rallis
Out of stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
- मोफत घरपोच सेवा
- मार्केट पेक्षा कमी दर
- जलद घरपोच सेवा
Share
पर्यायी उत्पादने
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये ॲसिटामिप्रीड २०% एस.पी. (Acetamiprid 20% SP) हा रासायनिक घटक असतो. जो SP स्वरूपात असतो. SP म्हणजे पाण्यात विरघळणारी भुकटी (Soluble Powder) आहे.
-
रासायनिक गट
▸हे निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक रासायनिक आंतरप्रवाही (Systemic) कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणीद्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action). यात 'ट्रान्सलॅमिनार' क्रिया देखील असते, ज्यामुळे पानांच्या वर फवारणी केली तरी ते खालच्या बाजूला असलेल्या किडींना मारते.
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सना (nAChR) बांधले जाते, ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन विस्कळीत होते. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो, कीटक अन्न खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : ०.५ ग्रॅम प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : १०० ग्रॅम प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग/किडी
-
कांदा
▸ फुलकिडे (Thrips)
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे
▸ पांढरी माशी -
बटाटा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ मावा
▸ तुडतुडे
▸ पांढरी माशी
▸ फुलकिडे (Thrips) -
आले,हळद
▸ कंदमाशी (काही प्रमाणात नियंत्रण)
▸ पानांवरील रसशोषक किडी -
टोमॅटो
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ मावा
▸ तुडतुडे -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा
▸ पांढरी माशी -
वांगे
▸ तुडतुडे (Jassids)
▸ मावा
▸ पांढरी माशी -
भेंडी
▸ तुडतुडे
▸ मावा
▸ पांढरी माशी -
गवार
▸ रसशोषक किडी
▸ मावा -
कापूस
▸ पांढरी माशी
▸ तुडतुडे
▸ मावा
▸ फुलकिडे -
झेंडू
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा -
शेवंती
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा -
सोयाबीन
▸ मावा
▸ तुडतुडे -
भुईमूग
▸ मावा
▸ तुडतुडे -
वाल घेवडा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे
▸ फुलकिडे -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे
▸ फुलकिडे -
हरभरा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे
▸ फुलकिडे -
वाटाणा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे
▸ फुलकिडे -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ मावा
▸ फुलकिडे
▸ पांढरी माशी -
भात
▸ तपकिरी तुडतुडे (BPH)
▸ हिरवे तुडतुडे -
गहू
▸ मावा (Aphids)
-
मका
▸ मावा
-
फ्रेंच बिन्स
▸ मावा
▸ फुलकिडे
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸रसशोषक किडींवर प्रभावी: हे प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि प्रामुख्याने फुलकिडे (Thrips) यांच्यावर उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
▸उत्कृष्ट आंतरप्रवाही गुणधर्म: हे झाडाच्या पानांद्वारे लवकर शोषले जाते, त्यामुळे पावसाचा परिणाम कमी होतो.
▸किफायतशीर: कमी डोसमध्ये आणि कमी खर्चात हे अतिशय प्रभावी निकाल देते.
▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे कपाशी, मिरची, कोबी, वांगी आणि इतर भाजीपाला पिकांवर सर्रास वापरले जाते.
▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): टाटा माणिक हे Group 4A गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता निळे आणि पिवळे चिकट सापळे वापरावेत.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या गटातील औषधांच्या जास्तीत जास्त २ ते ३ फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.