Syngenta Voliam Flexi

Syngenta Voliam Flexi

Syngenta

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

a

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Syngenta
उत्पादनाचे नाव Voliam Flexi
वापरण्याची पद्धत फवारणी, आळवणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Chlorantraniliprole 8.80%+ Thiamethoxam 17.50% w/w SC
रासायनिक गट Diamides +
Neonicotinoids
कीटकनाशक प्रकारआंतरप्रवाही 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये क्लोरँट्रानिलिप्रोल ८.८०% + थायमेथॉक्साम १७.५०% डब्ल्यू/डब्ल्यू एस.सी. (Chlorantraniliprole 8.80% + Thiamethoxam 17.50% w/w SC) हे रासायनिक घटक असतात. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पांढऱ्या रंगाचे दाट प्रवाही द्रव स्वरूप (Suspension Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे डायमाइड्स (Diamides) आणि निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) या दोन आधुनिक रासायनिक गटांचे मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक प्रबळ संयुक्त (Combination) रासायनिक आंतरप्रवाही (Systemic) कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी किंवा आळवणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे प्रबळ आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात किंवा पाने खातात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे दुहेरी पद्धतीने कार्य करते. यातील क्लोरँट्रानिलिप्रोल कीटकांच्या स्नायूंमधील कॅल्शिअमची पातळी विस्कळीत करते, तर थायमेथॉक्साम मज्जासंस्थेतील निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्सना (nAChR) बांधले जाते. यामुळे कीटकांना त्वरित अर्धांगवायू होतो, ते अन्न खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी, आळवणी (Drenching).

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : ०.५ मिली ते ०.७५ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : १०० मिली ते १२० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
    ▸ आळवणीचे प्रमाण: १८० ते २०० मिली प्रती एकर.

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ पाने खाणारी अळी

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिऱ्यासारखा ठिपका असलेला पतंग (DBM)
    ▸ मावा (Aphids)
    ▸ पांढरी माशी

  • बटाटा

    ▸ बटाटा पोखरणारी अळी
    ▸ मावा व तुडतुडे

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ पाने पोखरणा-या अळ्या (Leaf Miner)
    ▸ पांढरी माशी व मावा

  • आले,हळद

    ▸ खोड किडा
    ▸ तुडतुडे

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
    ▸ पाने पोखरणारी अळी
    ▸ पांढरी माशी व तुडतुडे

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ मावा व तुडतुडे

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे व पांढरी माशी

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • गवार

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ मावा

  • कापूस

    ▸ सर्व प्रकारच्या बोंड अळ्या (Bollworms)
    ▸ तुडतुडे
    ▸ पांढरी माशी
    ▸ फुलकिडे

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • सोयाबीन

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ चक्र भुंगा (Girdle Beetle)
    ▸ तुडतुडे व मावा

  • भुईमूग

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ चक्र भुंगा (Girdle Beetle)
    ▸ तुडतुडे व मावा

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ शेंग माशी
    ▸ मावा व तुडतुडे

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ शेंग माशी
    ▸ मावा व तुडतुडे

  • हरभरा

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ शेंग माशी
    ▸ मावा व तुडतुडे

  • वाटाणा

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ शेंग माशी
    ▸ मावा व तुडतुडे

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ रसशोषक किडी

  • भात

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)
    ▸ हिरवे तुडतुडे

  • गहू

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
    ▸ खोड किडा

  • मका

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंग पोखरणारी अळी
    ▸ मावा

  • ▸व्यापक नियंत्रण: हे एकाच वेळी रसशोषक किडी (उदा. मावा, तुडतुडे) आणि सर्व प्रकारच्या अळ्या (उदा. खोडकिडा, फळ पोखरणारी अळी) यांच्यावर उत्कृष्ट नियंत्रण देते.
    ▸दीर्घकालीन संरक्षण: यातील आंतरप्रवाही गुणामुळे हे पिकाला प्रदीर्घ काळासाठी कीडमुक्त ठेवते.
    ▸मुळांच्या विकासासाठी उपयुक्त: आळवणीद्वारे वापरल्यास हे झाडाची मुळे सशक्त करण्यास आणि वनस्पतीची जोमदार वाढ करण्यास मदत करते (Vigor Effect).
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे प्रामुख्याने भाजीपाला (वांगी, टोमॅटो), ऊस, द्राक्षे आणि कपाशी यांसारख्या पिकांवर वापरले जाते.
    ▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): व्होलियम फ्लेक्सी हे Group 28 आणि Group 4A चे मिश्रण आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता चिकट सापळे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त १ ते २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.