Syngenta Simodis

Syngenta Simodis

Syngenta

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Syngenta
उत्पादनाचे नाव Simodis 
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Isocycloseram 9.2%+ Isocycloseram 10% W/V DC
रासायनिक गट Isoxazoline
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये आयसोसायक्लोसेरम ९.२% डब्लू/डब्लू (Isocycloseram 9.2% w/w) हा रासायनिक घटक असतो. जो DC स्वरूपात असतो. DC म्हणजे पाण्यात विरघळणारे विद्राव्य द्रावण (Dispersible Concentrate) आहे. याला प्लिनीझोलिन (PLINAZOLIN) तंत्रज्ञान म्हणूनही ओळखले जाते.

  • रासायनिक गट

    ▸हे आयसोक्झॅझोलिन (Isoxazoline) या नवीन रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक आधुनिक, स्पर्शजन्य (Contact) आणि काही प्रमाणात आंतरप्रवाही गुणधर्म असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणीनंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी झालेला भाग खाल्ल्यास किंवा रस शोषल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या गाबा (GABA) रिसेप्टर्सवर कार्य करते, ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहनात मोठा अडथळा निर्माण होतो. यामुळे कीटकांना त्वरित अर्धांगवायू होतो, त्यांची हालचाल थांबते आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : १.२ मिली ते १.५ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : २४० मिली ते ३०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

  • कांदा

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

  • बटाटा

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

  • आले,हळद

  • टोमॅटो

  • मिरची,ढोबळी मिरची

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

  • कलिंगड,खरबूज,डांगर

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

  • थ्रिप्स आणि कोळीवर उत्कृष्ट नियंत्रण: हे प्रामुख्याने थ्रिप्स (Thrips), कोळी (Mites) आणि इतर कठीण रसशोषक किडींवर अत्यंत प्रभावी आहे.
    हवामानाचा परिणाम नाही: हे अति उच्च तापमानात आणि ऊन असतानाही उत्कृष्ट रिझल्ट देते.
    दीर्घकाळ संरक्षण: याचा प्रभाव पिकावर बराच काळ टिकतो, ज्यामुळे वारंवार फवारणी करण्याची गरज पडत नाही.
    पावसापासून संरक्षण: फवारणीनंतर लवकरच हे पानात शोषले जाते, त्यामुळे पावसाने धुवून जाण्याचा धोका कमी असतो.
    सर्व पिकांसाठी उपयुक्त: मिरची, टोमॅटो, कापूस आणि इतर भाजीपाला पिकांसाठी हे एक वरदान आहे.

  • गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): सिमोडिस हे Group 30 या नवीन गटातील आहे. ज्या किडींवर जुन्या औषधांचा परिणाम होत नाही, तिथे हे अत्यंत प्रभावी ठरते. तरीही, प्रतिकारशक्ती टाळण्यासाठी पुढच्या फवारणीला वेगळ्या गटातील औषध वापरावे.
    लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस अचूक घ्यावा. कमी डोसमुळे किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते.
    एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): रासायनिक फवारणीसोबत निळे आणि पिवळे चिकट सापळे वापरावेत.
    मर्यादित वापर: एका पीक हंगामात याची जास्तीत जास्त २ वेळा फवारणी करावी.
    मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध वापरताना मधमाश्या आणि इतर मित्र कीटकांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी, शक्यतो संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.