Skip to product information
1 of 1

Syngenta RidomilGold

Syngenta RidomilGold

Syngenta

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Syngenta
उत्पादनाचे नाव RidomilGold
वापरण्याची पद्धत फवारणी,आळवणी, ठिबक 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक Metalaxyl-M 4% + Mancozeb 64%  WG
रासायनिक गट Acylalanine + Dithiocarbamate 
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही + स्पर्शजन्य

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ यामध्ये मेटलॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यू.पी. (Metalaxyl 4 + Mancozeb 64% WP) Wettable Powder हे दोन रासायनिक घटक असतात.

  • रासायनिक गट

    ▸ डायथिओकार्बामेट्स + फिनाइलअमाइड्स
    (Dithiocarbamates + Phenylamides / Acylalanines)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact)

    ▸ यामधील मेटलॅक्झील (Metalaxyl) हे अत्यंत प्रभावी आंतरप्रवाही (Highly Systemic) बुरशीनाशक असल्यामुळे, फवारणी केल्यानंतर ते पानांद्वारे किंवा मुळांद्वारे अतिशय वेगाने शोषले जाते आणि वनस्पतींच्या 'झायलम' (Xylem) पेशींद्वारे वरच्या दिशेने (Acropetal movement) वहन करून वनस्पतीच्या नवीन येणाऱ्या फुटीपर्यंत पोहोचते.

    ▸ यामधील मॅन्कोझेब (Mancozeb) हे संपर्कजन्य (Contact) बुरशीनाशक असल्यामुळे, ते पानांच्या पृष्ठभागावर संरक्षक असा रासायनिक थर तयार करते आणि बुरशीचे बीजाणू अंकुरण्यापासून (Spore germination) रोखते.

    👉 Matco मध्ये तीव्र आंतरप्रवाही क्रिया आहे. (मेटलॅक्झील हे फवारणीनंतर ३० मिनिटांत झाडात शोषले जाते, त्यामुळे पाऊस आल्यास धुतले जात नाही).

    ▸ क्रिया प्रकार: प्रामुख्याने प्रतिबंधात्मक (Preventive) + उपचारात्मक (Curative / Kick-back Action).

    ▸ बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास, मॅन्कोझेबमुळे प्रभावी प्रतिबंधात्मक संरक्षण मिळते आणि रोगाचा शिरकाव होत नाही.

    ▸ बुरशीजन्य रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसताच वापरल्यास, मेटलॅक्झीलमुळे बुरशीची वाढ (Mycelial growth) आणि बीजाणू तयार होण्याची प्रक्रिया (Sporulation) आतून थांबवली जाते, ज्यामुळे रोगावर नियंत्रण मिळते.

  • कार्यपद्धती

    ▸ मॅन्कोझेब (Mancozeb) हे संपर्कजन्य (Contact) बहु-स्थळी क्रिया करणारे (Multi-site action) बुरशीनाशक आहे.
    ▸ मॅन्कोझेब बुरशीच्या पेशींमध्ये असलेल्या सल्फहायड्रिल (–SH) गट असलेल्या एंजाइम्सशी संयोग करून त्यांचे कार्य बंद करते. परिणामी बुरशीच्या महत्त्वाच्या चयापचय प्रक्रिया (Metabolic processes) जसे की श्वसन (Respiration), लिपिड चयापचय आणि ऊर्जा निर्मिती यावर परिणाम होतो, त्यामुळे बुरशीचे बीजाणू अंकुरणे (Spore germination) थांबते.
    👉 म्हणून मॅन्कोझेब मुख्यतः प्रतिबंधात्मक (Preventive) क्रिया करते.

    ▸ मेटलॅक्झील (Metalaxyl) हे उच्च क्षमतेचे आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक आहे (Acylalanine गट).
    ▸ मेटलॅक्झील हे बुरशीच्या पेशींमधील केंद्रकामध्ये (Nucleus) प्रवेश करून 'आर.एन.ए. पॉलिमरेज-१' (RNA Polymerase-I) या कॉम्प्लेक्सला बाधित करते. परिणामी बुरशीचे 'रायबोसोमल आर.एन.ए. संश्लेषण' (rRNA Synthesis) पूर्णपणे थांबते. आर.एन.ए. तयार न झाल्यामुळे बुरशीला नवीन प्रथिने (Proteins) बनवता येत नाहीत आणि बुरशीची वाढ (Mycelial growth) व बीजाणू निर्मिती (Sporulation) त्वरित थांबते.
    👉 म्हणून मेटलॅक्झील हे उपचारात्मक (Curative) आणि उच्चाटन (Eradicant) अशा दोन्ही प्रकारे अत्यंत प्रभावी काम करते.

    ▸ Mancozeb (FRAC M03) → बहु-स्थळी (Multi-site), Contact, Resistance ची शक्यता खूप कमी.
    ▸ Metalaxyl (FRAC 4) → Systemic (Phenylamide), Single-site (RNA synthesis blocker), High Resistance Risk.

    👉 दोन्ही एकत्र आल्यामुळे:
    ▸प्रतिबंधात्मक (Preventive): मॅन्कोझेबमुळे बीजाणू रुजत नाहीत.
    ▸उपचारात्मक (Curative): मेटलॅक्झीलमुळे पानांच्या आत शिरलेली बुरशी (Mycelium) मारली जाते (Kick-back action).

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी,आळवणी,ठिबक

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी :   2 ते 2.5 ग्रॅम प्रती लीटर
    ▸आळवणीसाठी :   2 ते 2.5  ग्रॅम प्रती लीटर
    ▸ ठिबकसाठी :   1 kg प्रती एकर

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (Secondary – Mancozeb)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Primary – Metalaxyl)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Primary)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Secondary)
    ▸ सेप्टोरिया ठिपके (Secondary)

  • बटाटा

    ▸ उशिरा येणारा करपा – Late blight (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके / Early blight (Secondary)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Primary)
    ▸ पायथियम रोपकुज (Primary – nursery stage)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Secondary)

  • आले,हळद

    ▸ रायझोम कंदकुज
    ▸अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ कंदकुज

  • टोमॅटो

    ▸ उशिरा येणारा करपा – Late blight (Primary)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary – nursery)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)
    ▸ सेप्टोरिया काळे ठिपके

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फाइटोफ्थोरा फळ व खोड कुज (Primary)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)

  • वांगे

    ▸ फाइटोफ्थोरा खोडकुज (Primary)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)

  • भेंडी

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary – nursery)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Secondary)

  • गवार

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Secondary)

  • कापूस

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ फाइटोफ्थोरा रूट रॉट (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)

  • झेंडू

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)

  • शेवंती

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)

  • सोयाबीन

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ पायथियम रूट रॉट (Primary)
    ▸ सेप्टोरिया ठिपके (Secondary)

  • भुईमूग

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ लीफ स्पॉट (Secondary – Cercospora)

  • वाल घेवडा 

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ पायथियम रूट रॉट (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)

  • हरभरा

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ रूट रॉट (Secondary – preventive)

  • वाटाणा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Primary)
    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Primary)
    ▸ पायथियम रोपकुज (Primary)
    ▸ फाइटोफ्थोरा कॉलर रॉट (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)

  • भात

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary – nursery)
    ▸ ब्राउन लीफ स्पॉट (Secondary – preventive)

  • गहू

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ सेप्टोरिया ठिपके (Secondary)

  • मका

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ पायथियम रूट रॉट (Primary)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ डॅम्पिंग ऑफ (Primary)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Secondary)

  • विशिष्ट श्रेणीतील नियंत्रण (Specific & Broad Spectrum Control) – हे प्रामुख्याने केवडा (Downy Mildew), उशिरा येणारा करपा (Late Blight), पांढरा तांबेरा (White Rust), फळकूज (Fruit Rot) आणि रोपमर (Damping off) यांसारख्या पाण्यामुळे किंवा आर्द्रतेमुळे वाढणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर (Oomycetes) अत्यंत प्रभावी नियंत्रण मिळवते.

    स्पर्शजन्य व तीव्र आंतरप्रवाही क्रिया (Contact & Highly Systemic Action) – हे एक संयुक्त बुरशीनाशक आहे. यातील 'मॅन्कोझेब' पानांच्या पृष्ठभागावर राहून (Contact) रोगाला रोखते, तर 'मेटलॅक्झील' हे अतिशय वेगाने पानांवाटे आणि मुळांवाटे शोषले जाऊन (Systemic) पिकाच्या आतून रोगाचा सामना करते.

    दुहेरी कार्यपद्धती (Preventive & Curative) – हे प्रतिबंधात्मक (रोग येण्याआधी) आणि उपचारात्मक (रोग आल्यानंतर) अशा दोन्ही प्रकारे उत्कृष्ट काम करते. विशेषतः, रोग पानांच्या आत शिरला असेल तरी मेटलॅक्झील तो शोधून नष्ट करते (याला Kick-back action म्हणतात).

    पिकाचा आरोग्य परिणाम (Phytotonic Effect) – यामध्ये ६४% मॅन्कोझेब असल्याने मॅन्गेनीज (Mn) आणि झिंक (Zn) हे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला मिळतात. यामुळे फवारणीनंतर पिकावर गडद हिरवेपणा (Greening Effect) येतो आणि पीक तजेलदार दिसते.

    WP स्वरूप (Wettable Powder) – हे पाण्यात पूर्णपणे मिसळणाऱ्या पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. हे फवारणी (Spraying) आणि विशेषतः आळवणी (Drenching) आणि बीजप्रक्रियेसाठी (रोपमर रोखण्यासाठी) अत्यंत सोपे आणि उपयुक्त आहे.

    प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management) – मेटलॅक्झील हे 'हाय रिस्क' औषध आहे, पण यात मॅन्कोझेब (Multisite) एकत्र असल्यामुळे, बुरशीमध्ये या बुरशीनाशकाविरुद्ध प्रतिकारशक्ती (Resistance) लवकर तयार होत नाही, ज्यामुळे हे दीर्घकाळ प्रभावी राहते.

  • 'क्रॉस रेझिस्टन्स' टाळणे (Avoid Cross-Resistance):
    ▸ शास्त्रीय कारण: या संयुक्त बुरशीनाशकात 4% 'मेटलॅक्झील' (Metalaxyl) आहे, जे 'फिनाईलअमाइड' (Phenylamide - FRAC Group 4) गटातील आहे. या गटातील बुरशीनाशकांविरुद्ध बुरशीमध्ये सर्वात वेगाने प्रतिकारशक्ती (Resistance) तयार होते. जर एकाच गटातील औषधे वारंवार वापरली, तर बुरशी त्यांना ओळखू लागते.
    ▸ टीप: जर तुम्ही मागील फवारणीत हे बुरशीनाशक (Matco/Ridomil) वापरले असेल, तर लगेच पुढील फवारणीत पुन्हा हेच किंवा या गटातील इतर औषध (उदा. बेनालॅक्झील) वापरू नका. त्याऐवजी वेगळ्या गटाचे बुरशीनाशक वापरा.

    'मोड ऑफ ॲक्शन' मध्ये बदल (Rotate Mode of Action):
    ▸ शास्त्रीय कारण: यातील 'मेटलॅक्झील' हे घटक बुरशीच्या 'आर.एन.ए.' (RNA synthesis) तयार करण्याच्या प्रक्रियेत एका विशिष्ट ठिकाणी (Single Site) अडथळा आणते. जर याचा सतत वापर केला, तर बुरशी जनुकीय बदल करून या अडथळ्याला बायपास करायला शिकते.
    ▸ टीप: साखळी तोडण्यासाठी, या फवारणीनंतर पुढील फवारणीत 'सायमोक्झानील' (Cymoxanil - Curzate), 'डायमेथोमॉर्फ' (Dimethomorph - Acrobat) किंवा 'मँडिप्रोपॅमिड' (Revus) यांसारख्या पूर्णपणे वेगळ्या कार्यपद्धतीच्या बुरशीनाशकांचा वापर करावा.

    'रेडी-मिक्स' फायदा (Ready-Mix Strategy - Synergy):
    ▸ शास्त्रीय कारण: मेटलॅक्झील हे 'हाय रिस्क' (High Risk) बुरशीनाशक आहे. ते एकटे वापरल्यास बुरशी काही दिवसांतच त्याला दाद देईनाशी होते. म्हणूनच यात 'मॅन्कोझेब' (मल्टी साईट - गट M3) मिसळलेले असते. मॅन्कोझेब बुरशीला बाहेरून रोखते, ज्यामुळे आतील मेटलॅक्झीलला काम करणे सुरक्षित व सोपे जाते.
    ▸ टीप: हे बुरशीनाशक वापरताना यात दुसरे कोणतेही बुरशीनाशक मिसळण्याची गरज नाही. कंपनीने हे मिश्रण अशा प्रकारे बनवले आहे की जेणेकरून 'रेझिस्टन्स' तयार होणार नाही.

    वापराची वारंवारता (Frequency of Application):
    ▸ नियम: एका पिकाच्या हंगामात (Crop Season) हे संयुक्त बुरशीनाशक जास्तीत जास्त २ ते ३ वेळाच वापरावे.
    ▸ टीप: हे बुरशीनाशक 'हुकमी एक्का' आहे, त्यामुळे ते सुरुवातीच्या वाढीच्या काळात किंवा जेव्हा हवामान खूप खराब (ढगाळ/पावसाळी) असेल तेव्हाच वापरावे. सलग फवारण्या टाळाव्यात.

    उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):
    ▸ शास्त्रीय कारण: मेटलॅक्झीलमध्ये 'क्यूरेटिव्ह' (रोग आल्यावर काम करणारी) ताकद जबरदस्त आहे. पण, जर रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त (Heavy Infestation) झाला असेल, तर बुरशीची संख्या अब्जावधीत असते. अशा वेळी रेझिस्टंट बुरशी तयार होण्याची शक्यता वाढते.
    ▸ टीप: रोगाची लक्षणे दिसताच किंवा 'रोग येण्यापूर्वी' (पाऊस पडणार असेल तर आधी) याचा वापर केल्यास सर्वात उत्कृष्ट आणि सुरक्षित रिझल्ट मिळतो.

    योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):
    ▸ शास्त्रीय कारण: 'फिनाईलअमाइड' गटातील औषधांचा डोस जर कमी पडला, तर बुरशीला 'सब-लिथल' (Sub-lethal) डोस मिळतो. यामुळे बुरशी मरत तर नाहीच, उलट ती औषधाला पचवायला शिकते आणि पुढची पिढी अधिक घातक बनते.
    ▸ टीप: नेहमी शिफारस केलेला डोस (२ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर) तंतोतंत वापरावा. कव्हरेज पूर्ण झाडावर मिळणे आवश्यक आहे कारण यातील मॅन्कोझेबला पानावर पसरणे गरजेचे असते.