Syngenta Karate

Syngenta Karate

Syngenta

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Syngenta 
उत्पादनाचे नाव Karate
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Lambda-cyhalothrin
5% EC
रासायनिक गट Pyrethroids
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य +
पोटविष

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये लॅम्बडा-सायहेलोथ्रिन ५% ई.सी. (Lambda-cyhalothrin 5% EC) हा रासायनिक घटक असतो. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात मिसळल्यावर पांढरे दुधाल द्रावण तयार होणारे तेलकट द्रव स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स (Synthetic Pyrethroids) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक रासायनिक स्पर्शजन्य आणि पोटविष (Contact and Stomach) गुणधर्म असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेला झाडाचा भाग किंवा पाने खाल्ल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करून विषबाधा करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे मज्जातंतूंमधील सोडियम चॅनेलमध्ये (Sodium Channels) व्यत्यय आणते, ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन अतिउत्तेजित होऊन विस्कळीत होते. यामुळे कीटकाला त्वरित अर्धांगवायू होतो, कीटक हालचाल व अन्न खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : १ मिली ते १.५ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : २५० मिली ते ३०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरामाग अळी (Diamond Back Moth - DBM)
    ▸ पाने खाणारी अळी

  • बटाटा

    ▸ मावा (Aphids)
    ▸ तुडतुडे (Jassids)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फळमाशी (Fruit Fly)
    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ भुंगेरे (Beetles)

  • आले,हळद

    ▸ कंदमाशी
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
    ▸ मावा

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ कोळी (Mites - काही प्रमाणात)
    ▸ फळ पोखरणारी अळी

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer)
    ▸ तुडतुडे

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • गवार

    ▸ रसशोषक किडी

  • कापूस

    ▸ बोंड अळी (Bollworms - अमेरिकन, ठिपक्यांची, गुलाबी)
    ▸ तुडतुडे, फुलकिडे

  • झेंडू

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • शेवंती

    ▸ कळी पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • सोयाबीन

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • भुईमूग

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ शेंग पोखरणारी अळी

  • वाल घेवडा 

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ मावा

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
    ▸ मावा

  • हरभरा

    ▸ घाटा अळी (Helicoverpa)

  • वाटाणा

    ▸ घाटा अळी (Helicoverpa)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फळमाशी
    ▸ तांबडे भुंगेरे

  • भात

    ▸ खोड किडा (Stem Borer)
    ▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder)
    ▸ लष्करी अळी

  • गहू

    ▸ लष्करी अळी (Armyworm)
    ▸ खोड किडा

  • मका

    ▸ लष्करी अळी (Armyworm)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

  • ▸जलद नॉक-डाऊन परिणाम: स्पर्शजन्य गुणामुळे हे कीटकांच्या संपर्कात येताच त्यांना त्वरित जमिनीवर पाडते आणि अत्यंत वेगाने नष्ट करते.
    ▸व्यापक नियंत्रण: हे प्रामुख्याने बोंड अळी, पाने खाणारी अळी, शेंडा व फळ पोखरणारी अळी आणि काही रसशोषक किडींवर (उदा. तुडतुडे, थ्रिप्स) प्रभावी आहे.
    ▸अंडीनाशक गुणधर्म: हे किडींच्या अंड्यांवरही परिणाम करते, ज्यामुळे किडींची नवीन पिढी रोखण्यास मदत होते.
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे कापूस, भात (धान), सोयाबीन, भाजीपाला आणि फळपिकांवरील विविध अळ्यांच्या नियंत्रणासाठी अत्यंत विश्वासार्ह औषध आहे.
    ▸झडप निवारण (Repellent Effect): याच्या उग्र वासामुळे आणि गुणधर्मामुळे किडींना पिकावर येण्यापासून रोखण्यास मदत होते.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): कराटे हे Group 3A गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि प्रकाश सापळ्यांचा अवलंब करावा.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्या आणि माशांसाठी अत्यंत विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा जलाशय जवळ असताना फवारणी टाळावी.