Skip to product information
1 of 1

PI Visma

PI Visma

PI

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव PI
उत्पादनाचे नाव Visma
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायरिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक Pyraclostrobin 12.8%  + Boscalid 25.2% WG
रासायनिक गट   Strobilurins+ SDHI
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही + 
ट्रान्सलॅमिनर 

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    पायरॅक्लोस्ट्रोबिन १२.८% + बोस्कालि़ड २५.२% डब्ल्यू.जी.

  • रासायनिक गट

    पायरॅक्लोस्ट्रोबिन: स्ट्रॉबिल्युरिन्स (Strobilurins - Group 11)

    बोस्कालि़ड: SDHI (Succinate Dehydrogenase Inhibitor - Group 7)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही + ट्रान्सलॅमिनर (Systemic + Translaminar)

    बोस्कालि़ड: हे एक उत्कृष्ट आंतरप्रवाही घटक आहे जे झाडाच्या पानांच्या पेशींमध्ये शिरून सर्वत्र पसरते.

    पायरॅक्लोस्ट्रोबिन: यामध्ये उत्कृष्ट ट्रान्सलॅमिनर क्रिया आहे, ज्यामुळे औषध पानाच्या वरच्या बाजूला फवारले तरी ते खालच्या बाजूच्या बुरशीचा नाश करते.

    क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक (Preventive) + उपचारात्मक (Curative).

  • कार्यपद्धती

    बोस्कालि़ड (SDHI): हे बुरशीच्या पेशींमधील 'सक्सीनेट डिहायड्रोजनेज' प्रक्रियेत अडथळा आणते. यामुळे बुरशीच्या पेशींची ऊर्जा (ATP) निर्मिती थांबते.

    पायरॅक्लोस्ट्रोबिन: हे बुरशीच्या पेशींमधील श्वसन प्रक्रियेला (Complex III) खंडित करते. यामुळे बुरशीचे बीजाणू अंकुरणे आणि वाढ त्वरित थांबते.
    👉 हे दुहेरी आक्रमण बुरशीला ऊर्जाहीन करून नष्ट करते.

  • वापरण्याची पद्धत

    फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    फवारणी: १.५ ते २ ग्रॅम प्रति लीटर पाणी.

    एकरी वापर: ३०० ग्रॅम ते ४०० ग्रॅम प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (Purple Blotch)
    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
    ▸ भुरी (Powdery Mildew)

  • बटाटा

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • आले,हळद

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ ठिपके (Leaf Spot)

  • टोमॅटो

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ सेप्टोरिया ठिपके (Septoria Leaf Spot)
    ▸ भुरी (Powdery Mildew)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • वांगे

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • भेंडी

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)

  • गवार

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • कापूस

    ▸ दहिया रोग (Grey Mildew)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)

  • झेंडू

    ▸ करपा (Blight)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • शेवंती

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • सोयाबीन

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)

  • भुईमूग

    ▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाल घेवडा 

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)

  • हरभरा

    ▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाटाणा

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ तांबेरा (Rust)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • भात

    ▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
    ▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration)

  • गहू

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)

  • मका

    ▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • व्यापक रोग नियंत्रण (Broad Spectrum): हे भूरी (Powdery Mildew), करपा (Anthracnose), अल्टरनेरिया, आणि डाग (Leaf Spots) यांसारख्या अनेक रोगांवर एकाच वेळी प्रभावी आहे.

    उत्कृष्ट फळ चकाकी (Fruit Quality): द्राक्ष, डाळिंब आणि मिरचीमध्ये फळांचा रंग आणि चकाकी वाढवण्यासाठी हे औषध ओळखले जाते.

    अॅग्सेलेन्स (AgCelence) प्रभाव: पायरॅक्लोस्ट्रोबिनमुळे झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते, ज्यामुळे झाड हिरवेगार आणि जोमदार दिसते.

    दीर्घकालीन सुरक्षा: एकदा फवारणी केल्यावर पिकाला सुमारे १० ते १२ दिवसांपर्यंत सुरक्षा मिळते.

  • 'क्रॉस रेझिस्टन्स' टाळणे:

    • विस्मामध्ये दोन भिन्न गटांचे (Group 7 & 11) रेणू असल्यामुळे बुरशीला या औषधाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करणे कठीण जाते.

    पाऊस प्रतिरोध (Rain Fastness):

    • फवारणीनंतर साधारण २ तासांनी पाऊस आल्यास याच्या निकालावर फारसा परिणाम होत नाही.