PI Pressedo
PI Pressedo
PI
Out of stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
- मोफत घरपोच सेवा
- मार्केट पेक्षा कमी दर
- जलद घरपोच सेवा
Share
पर्यायी उत्पादने
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये सायक्लॅनिलिप्रोल १०% डब्ल्यू/व्ही डी.सी. (Cyclaniliprole 10% w/v DC) हा रासायनिक घटक असतो. जो DC स्वरूपात असतो. DC म्हणजे पाण्यात मिसळणारे विद्राव्य संहत स्वरूप (Dispersible Concentrate) आहे.
-
रासायनिक गट
▸हे अँथ्रानिलिक डायनामाइड्स (Anthranilic Diamides) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक आधुनिक आणि उच्च क्षमतेचे आंतरप्रवाही (Systemic) कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणीनंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा पाला खातात किंवा रस शोषतात, तेव्हा हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या स्नायू संस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या स्नायूंमधील रायानोडिन रिसेप्टर्स (RyR) ला बांधले जाते, ज्यामुळे स्नायू आकुंचन पावून कीटकाला अर्धांगवायू होतो. यामुळे कीटक अन्न खाणे त्वरित बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : १.२५ मिली प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : २५० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग/किडी
-
कांदा
▸ लष्करी अळी (Spodoptera)
▸ फुलकिडे (Thrips - अंशतः नियंत्रण) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ हिराकुस कडा (Diamond Back Moth - DBM)
▸ कोबीवरील अळी (Cabbage Caterpillar)
▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी -
बटाटा
▸ बटाटा पोखरणारी अळी (Potato Tuber Moth)
▸ पाने खाणारी अळी -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ फळमाशी (Fruit Fly)
▸ पाने पोखरणारी अळी (Leaf Miner)
▸ अमेरिकन लष्करी अळी -
आले,हळद
▸ खोडकिडा (Shoot Borer)
▸ पाने गुंडाळणारी अळी -
टोमॅटो
▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
▸ दक्षिण अमेरिकन टोमॅटो पिनवर्म (Tuta Absoluta)
▸ नागअळी (Leaf Miner) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फळ पोखरणारी अळी
▸ लष्करी अळी
▸ फुलकिडे (Thrips) -
वांगे
▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer)
▸ लष्करी अळी -
भेंडी
▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
▸ शेंडे पोखरणारी अळी -
गवार
▸ शेंगा पोखरणारी अळी
▸ अळीवर्गीय कीड -
कापूस
▸ बोंड अळी (Pink & American Bollworm)
▸ पाने खाणारी अळी
▸ ठिपक्यांची बोंड अळी -
झेंडू
▸ कळी पोखरणारी अळी
▸ पाने खाणारी अळी -
शेवंती
▸ कळी पोखरणारी अळी
▸ पाने खाणारी अळी -
सोयाबीन
▸ खोड माशी (Stem Fly)
▸ गर्डल बीटल (Chakrabring)
▸ उंट अळी (Semilooper)
▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी -
भुईमूग
▸ पाने खाणारी अळी
▸ पाने गुंडाळणारी अळी -
वाल घेवडा
▸ शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ पाने खाणारी अळी -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer)
▸ पाने खाणारी अळी -
हरभरा
▸ घाटा अळी (Heliothis/Pod Borer)
-
वाटाणा
▸ शेंगा पोखरणारी अळी
-
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ फळमाशी
▸ पाने पोखरणारी अळी
▸ लष्करी अळी -
भात
▸ खोडकिडा (Stem Borer)
▸ पाने गुंडाळणारी अळी (Leaf Folder) -
गहू
▸ लष्करी अळी
-
मका
▸ अमेरिकन लष्करी अळी (Fall Armyworm)
▸ खोड किडा -
फ्रेंच बिन्स
▸ शेंगा पोखरणारी अळी
▸ अळीवर्गीय कीड
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸अळी वर्गातील किडींवर प्रभावी: हे प्रामुख्याने सर्व प्रकारच्या अळ्या (उदा. लष्करी अळी, फळ पोखरणारी अळी, डायमंड बॅक मॉथ) यांवर उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
▸त्वरित परिणाम: फवारणीनंतर काही तासांतच अळ्या खाणे बंद करतात, त्यामुळे पिकाचे नुकसान त्वरित थांबते.
▸दीर्घकालीन संरक्षण: याचा प्रभाव पिकावर १० ते १५ दिवसांपर्यंत टिकून राहतो.
▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे मिरची, कोबी, टोमॅटो आणि इतर नगदी पिकांवर वापरता येते.
▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): प्रेसिडो हे Group 28 गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. अयोग्य डोसमुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होऊ शकते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या गटातील औषधांच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मित्र कीटकासांठी तुलनेने सुरक्षित असले तरी, मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळणे फायदेशीर ठरते.