Skip to product information
1 of 1

NACL Slogan

NACL Slogan

NACL

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव NACL 
उत्पादनाचे नाव Slogan
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक   Picoxystrobin 6.78%+
Tricyclazole 20.33% SC
रासायनिक गट Strobilurins +
Triazolo-benzothiazole
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही +
वाफेची क्रिया

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ पिकॉक्सिस्ट्रोबिन ६.७८% + ट्रायसायक्लॅझोल २०.३३% एस.सी.
    (Picoxystrobin 6.78% + Tricyclazole 20.33% SC)

  • रासायनिक गट

    ▸ स्ट्रॉबिल्युरिन्स + ट्रायझोलो-बेंझोथियाझोल
    (Strobilurins + Triazolo-benzothiazole)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: तीव्र आंतरप्रवाही + वाफेची क्रिया (Highly Systemic + Vapour Action)
    ▸ यामधील ट्रायसायक्लॅझोल (Tricyclazole) हे अत्यंत गतिमान आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. फवारणीनंतर ते पानांद्वारे किंवा मुळांद्वारे वेगाने शोषले जाते आणि वनस्पतीच्या शेंड्यापर्यंत (Acropetal movement) वहन केले जाते.
    ▸ यामधील पिकॉक्सिस्ट्रोबिन (Picoxystrobin) हे नवीन पिढीचे आंतरप्रवाही औषध आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची 'वाफेची क्रिया' (Vapour Phase Activity). यामुळे औषध वाफेच्या स्वरूपात पिकाच्या दाट भागातही पसरते.
    👉 गॅलिलिओ फवारणीनंतर १ तासात झाडात शोषले जाते, त्यामुळे याला उत्कृष्ट 'रेनफास्टनेस' प्राप्त होतो.

    ▸ क्रिया प्रकार: प्रामुख्याने प्रतिबंधात्मक (Preventive) + उपचारात्मक (Curative).
    ▸ बुरशीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास, ट्रायसायक्लॅझोलमुळे बुरशीला पानात शिरकावच करता येत नाही.

  • कार्यपद्धती

    ▸ ट्रायसायक्लॅझोल (Tricyclazole): हे बुरशीच्या पेशींमधील 'मेलॅनिन' (Melanin Biosynthesis) प्रक्रियेला रोखते. बुरशीला पानात छिद्र पाडून आत शिरण्यासाठी मेलॅनिनची गरज असते. मेलॅनिन तयार न झाल्यामुळे बुरशीचा शिरकाव (Penetration) थांबतो.
    👉 म्हणून हे मुख्यतः प्रतिबंधात्मक (Preventive) कार्य करते.
    ▸ पिकॉक्सिस्ट्रोबिन (Picoxystrobin): हे बुरशीच्या पेशींमधील ऊर्जेचे केंद्र (Mitochondria) निकामी करते. ऊर्जा निर्मिती थांबल्यामुळे बुरशीची वाढ जागीच थांबते.
    👉 म्हणून हे उपचारात्मक (Curative) कार्य करते.

  • वापरण्याची पद्धत

    फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: २ मिली प्रति लीटर पाणी.
    ▸ एकरी वापर: ४०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (Purple Blotch)
    ▸ मानांवरील करपा (Neck Blight)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

  • बटाटा

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • आले,हळद

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ ठिपके (Leaf Spot)

  • टोमॅटो

    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ भुरी (Powdery Mildew)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • वांगे

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • भेंडी

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)

  • गवार

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • कापूस

    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
    ▸ दहिया रोग (Grey Mildew)

  • झेंडू

    ▸ करपा (Blight)
    ▸ भुरी (Powdery Mildew)

  • शेवंती

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • सोयाबीन

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)

  • भुईमूग

    ▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ तांबेरा (Rust)

  • हरभरा

    ▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाटाणा

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ भुरी (Powdery Mildew)
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • भात

    ▸ करपा (Rice Blast)
    ▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
    ▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration)

  • गहू

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ भुरी (Powdery Mildew)

  • मका

    ▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)

  • मानमोडी/करपा तज्ज्ञ (Blast Specialist): भात पिकावरील मानमोडी (Neck Blast) आणि पानावरील करपा (Leaf Blast) यासाठी हे जगातील सर्वात शक्तिशाली औषधांपैकी एक आहे.

    पाऊस स्थिरता: फवारणीनंतर १ तासात पाऊस आला तरी औषध धुऊन जात नाही, त्यामुळे पावसाळ्यात हे अत्यंत खात्रीशीर आहे.

    धान्याची गुणवत्ता: गॅलिलिओच्या वापरामुळे भाताचे दाणे तजेलदार आणि भरगच्च भरतात. तांदूळ सडताना (Milling) तुटण्याचे प्रमाण कमी होते.

    पिकावर तजेला (Phytotonic Effect): यामुळे पिकात हरितद्रव्य वाढून पाने गडद हिरवी होतात, ज्यामुळे अन्नाची निर्मिती जास्त होऊन उत्पादन वाढते.

  • 'मेलॅनिन' रोखण्याची शक्ती:
    शास्त्रीय कारण: ट्रायसायक्लॅझोल हे बुरशीला झाडात प्रवेश करण्यापासून रोखते. जर बुरशी आत शिरलीच नाही, तर रोग पसरत नाही.
    टीप: भात पिकामध्ये 'मानमोडी' (Neck Blast) टाळण्यासाठी पीक पोटरी अवस्थेत असतानाच याची पहिली फवारणी करणे सर्वात फायदेशीर ठरते.
    वाफेच्या क्रियेचा फायदा (Vapour Phase):
    शास्त्रीय कारण: पिकॉक्सिस्ट्रोबिन हे मेणासारख्या थराशी लवकर संयोग पावते आणि वाफेचे वलय तयार करते.
    टीप: भाताच्या दाट पिकामध्ये जिथे औषधाचे थेंब पोहोचत नाहीत, तिथे ही वाफेची क्रिया संरक्षण देते.