Skip to product information
1 of 1

IIL Cyfi

IIL Cyfi

IIL

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव IIL
उत्पादनाचे नाव CYFI
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Cyazofamid 6.2%+
Mancozeb 60.8% WP
रासायनिक गट Cyano-imidazole +
Dithiocarbamates
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही +
संपर्कजन्य

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    सायाझोफॅमिड 6.2% + मॅन्कोझेब 60.8% WP
    Cyazofamid 6.2% + Mancozeb 60.8% WP

  • रासायनिक गट

    ▸ सायाझो-इमिडाझोल + डायथिओकार्बामेट्स
    (Cyano-imidazole + Dithiocarbamates)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: प्रगत आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact)
    ▸ यामधील सायाझोफॅमिड (Cyazofamid) हे एक अत्यंत विशिष्ट श्रेणीतील आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. यात 'ट्रान्सलॅमिनर' क्रिया आहे, ज्यामुळे ते पानाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला वेगाने पसरते.
    ▸ यामधील मॅन्कोझेब (Mancozeb) हे संपर्कजन्य बुरशीनाशक असून ते पानांच्या पृष्ठभागावर संरक्षक थर तयार करते.
    👉 हे मिश्रण फवारणीनंतर केवळ ३० ते ६० मिनिटांत झाडात शोषले जाते, त्यामुळे याला जगात सर्वोत्तम 'रेनफास्टनेस' (पाऊस स्थिरता) प्राप्त आहे.

    ▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक (Preventive) + उपचारात्मक (Curative).
    ▸ हे बुरशीचे बीजाणू (Spores) अंकुरण्यापासून रोखतेच, पण रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास तो पसरण्यापासून कडकपणे थांबवते.

  • कार्यपद्धती

    ▸ मॅन्कोझेब: हे संपर्कजन्य (Multi-site) असून बुरशीच्या श्वसन आणि ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत अडथळा आणते.
    ▸ सायाझोफॅमिड: हे बुरशीच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया'मध्ये Complex III (Qi site) वर हल्ला करते. हे बुरशीच्या ऊर्जेचे स्त्रोत पूर्णपणे बंद करते. यामुळे बुरशीचे बीजाणू (Zoospores) हालचाल करू शकत नाहीत आणि त्यांचा मृत्यू होतो.
    👉 हे बुरशीच्या जीवनचक्रातील 'बीजाणू निर्मिती' (Sporulation) अत्यंत प्रभावीपणे थांबवते, ज्यामुळे रोगाची साखळी तुटते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: २ ग्रॅम ते २.५ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
    ▸ एकरी प्रमाण: ५०० ग्रॅम प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

  • कांदा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ मुळकुज (Root Rot)

  • बटाटा

    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ मुळकुज / कोलमडणे (Damping Off)

  • आले,हळद

  • टोमॅटो

    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ फळकुज (Fruit Rot - Phytophthora)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • वांगे

  • भेंडी

  • गवार

  • कापूस

  • झेंडू

  • शेवंती

  • सोयाबीन

  • भुईमूग

  • वाल घेवडा 

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

  • हरभरा

  • वाटाणा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

  • भात

  • गहू

  • मका

  • फ्रेंच बिन्स

  • केवडा तज्ज्ञ (Downy Specialist): हे विशेषतः केवडा (Downy Mildew) आणि उशिरा येणारा करपा (Late Blight) या रोगांसाठी जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानले जाते.

    दुहेरी कृती: मॅन्कोझेब बाहेरून सुरक्षा देते, तर सायाझोफॅमिड आतून बुरशीला संपवते.

    अँटी-स्पोरुलंट: हे नवीन बीजाणू तयार होऊ देत नाही, ज्यामुळे रोग बागेत पुढे सरकत नाही.

    पिकावर हिरवेपणा: मॅन्कोझेबच्या उपस्थितीमुळे पिकाला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि पीक तजेलदार दिसते.

    सुरक्षितता: हे फळांच्या आणि फुलांच्या अवस्थेत वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे (Phytosafe).

  • 'नवा कार्यगट' (Unique FRAC Group 21):
    शास्त्रीय कारण: सायाझोफॅमिड हे ग्रुप २१ मधील आहे. ज्या बागांमध्ये मेटलॅक्झील (टाटा मास्टर/रिडोमिल) विरुद्ध बुरशीमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, तिथे हे औषध 'हुकमी एक्का' ठरते.
    टीप: हे औषध 'क्रॉस रेझिस्टन्स' तोडण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.
    पावसाळी वातावरणात सुरक्षा:
    शास्त्रीय कारण: हे औषध पानाच्या मेणासारख्या थराशी (Cuticle) घट्ट चिकटून राहते.
    टीप: जर सतत पाऊस असेल आणि केवडा (Downy) आटोक्यात येत नसेल, तर हे औषध हमखास निकाल देते.