FMC Rogor
FMC Rogor
FMC
Out of stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Organophosphate
आंतरप्रवाही
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
- मोफत घरपोच सेवा
- मार्केट पेक्षा कमी दर
- जलद घरपोच सेवा
Share
पर्यायी उत्पादने
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये डायमेथोएट ३०% ई.सी. (Dimethoate 30% EC) हा रासायनिक घटक असतो. जो EC स्वरूपात असतो. EC म्हणजे पाण्यात टाकल्यावर पांढरे द्रावण तयार होणारे तेलकट द्रव स्वरूप (Emulsifiable Concentrate) आहे.
-
रासायनिक गट
▸हे ऑर्गनोफॉस्फफेट (Organophosphate) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक रासायनिक आंतरप्रवाही (Systemic) आणि स्पर्शजन्य कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या शरीरातील 'ॲसिटिलकोलिनस्टेरेस' (AChE) या एन्झाईमच्या कार्याला रोखते, ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन विस्कळीत होते. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो, कीटक हालचाल व अन्न खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : १.५ मिली ते २ मिली प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : ३०० मिली ते ४०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग/किडी
-
कांदा
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ मावा (Aphids)
▸ फुलकिडे (Thrips)
▸ पानांवरील तुडतुडे -
बटाटा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ फळमाशी (Fruit Fly - प्रतिबंधात्मक) -
आले,हळद
▸ फुलकिडे (Thrips)
▸ पाने खाणारी अळी (सुरुवातीची अवस्था) -
टोमॅटो
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फुलकिडे (Thrips)
▸ मावा (Aphids)
▸ कोळी (Mites - सौम्य प्रादुर्भाव) -
वांगे
▸ तुडतुडे (Jassids)
▸ मावा (Aphids)
▸ पांढरी माशी -
भेंडी
▸ तुडतुडे (Jassids)
▸ मावा (Aphids) -
गवार
▸ तुडतुडे (Jassids)
▸ मावा (Aphids) -
कापूस
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ फुलकिडे (Thrips)
▸ पांढरी माशी -
झेंडू
▸ मावा (Aphids)
▸ फुलकिडे (Thrips) -
शेवंती
▸ मावा (Aphids)
▸ फुलकिडे (Thrips) -
सोयाबीन
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी
▸ खोड माशी (सुरुवातीची अवस्था) -
भुईमूग
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
वाल घेवडा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ फुलकिडे (Thrips) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
-
हरभरा
▸ मावा (Aphids)
-
वाटाणा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ मावा (Aphids)
▸ फुलकिडे (Thrips) -
भात
▸ हिरवे तुडतुडे (GLH)
▸ तपकिरी तुडतुडे (BPH)
▸ गॉल मिज (Gall Midge) -
गहू
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे -
मका
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे -
फ्रेंच बिन्स
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸बहुविध कीड नियंत्रण: हे प्रामुख्याने मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी आणि कोळी (Mites) यांसारख्या रसशोषक किडींवर प्रभावी आहे.
▸उत्कृष्ट आंतरप्रवाही गुणधर्म: हे झाडाच्या पानांद्वारे वेगाने शोषले जाते आणि संपूर्ण झाडात पसरते, ज्यामुळे लपलेल्या किडींचेही नियंत्रण होते.
▸दुहेरी परिणाम: हे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही अशा दोन्ही पद्धतीने काम करत असल्याने याचा रिझल्ट लवकर मिळतो.
▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे भाजीपाला, मिरची, कांदा, बटाटा आणि नगदी पिकांवर (उदा. कपाशी) वापरता येते.
▸किफायतशीर: इतर आधुनिक कीटकनाशकांच्या तुलनेत हे कमी खर्चात चांगले परिणाम देणारे जुने आणि विश्वासार्ह औषध आहे.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): रोगोर हे Group 1B गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील (उदा. Group 4A) कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता पिवळे चिकट सापळे आणि जैविक नियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्त फवारण्या टाळाव्यात जेणेकरून किडींमध्ये प्रतिकारशक्ती येणार नाही.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.