FMC Corprima
FMC Corprima
FMC
Out of stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
- मोफत घरपोच सेवा
- मार्केट पेक्षा कमी दर
- जलद घरपोच सेवा
Share
पर्यायी उत्पादने
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये क्लोरँट्रानिलिप्रोल ३५% डब्ल्यू.जी. (Chlorantraniliprole 35% WG) हा रासायनिक घटक असतो. जो WG स्वरूपात असतो. WG म्हणजे पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूप (Wettable Granules) आहे.
-
रासायनिक गट
▸हे अँथ्रानिलिक डायनामाइड्स (Anthranilic diamides) या रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक आधुनिक आणि प्रगत आंतरप्रवाही (Systemic) कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणी किंवा आळवणी द्वारे वापरल्यानंतर किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटक ज्यावेळेस पिकाचा भाग खातात, तेव्हा हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या स्नायू संस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या स्नायूंमधील 'रायानोडिन रिसेप्टर्स' (RyR) उघडते, ज्यामुळे पेशींमधील कॅल्शियमचा साठा संपतो. यामुळे कीटकाचे स्नायू आकुंचन पावतात, कीटक अर्धांगवायू झाल्यासारखा होतो आणि अन्न खाणे त्वरित बंद करतो. परिणामी काही दिवसांत कीटकाचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : ०.१७ ग्रॅम ते ०.२ ग्रॅम प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : ३४ ग्रॅम ते ४० ग्रॅम प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग/किडी
-
कांदा
▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ हिराकुस अळी (Diamond Back Moth - DBM)
-
बटाटा
▸ बटाटा कंद अळी (PTM)
▸ पाने खाणारी अळी -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ फळ पोखरणारी अळी
▸ पाने खाणारी अळी -
आले,हळद
▸ खोड पोखरणारी अळी
-
टोमॅटो
▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
▸ पान पोखरणाऱ्या अळ्या (Leaf Miner) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
▸ पाने खाणारी अळी -
वांगे
▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Shoot & Fruit Borer)
-
भेंडी
▸ फळ पोखरणारी अळी
-
गवार
▸ शेंग पोखरणारी अळी
-
कापूस
▸ अमेरिकन बोंड अळी
▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera) -
झेंडू
▸ कळी पोखरणारी अळी
▸ पाने खाणारी अळी -
शेवंती
▸ कळी पोखरणारी अळी
▸ पाने खाणारी अळी -
सोयाबीन
▸ उंट अळी (Semilooper)
▸ तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Tobacco Caterpillar)
▸ शेंग पोखरणारी अळी -
भुईमूग
▸ पाने खाणारी अळी
-
वाल घेवडा
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ शेंग पोखरणारी अळी (Pod Borer)
-
हरभरा
▸ घाटा अळी (Helicoverpa armigera)
-
वाटाणा
▸ शेंग पोखरणारी अळी
-
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ फळ पोखरणारी अळी (Fruit Borer)
-
भात
▸ खोड किडा (Stem Borer)
-
गहू
▸ लष्करी अळी
-
मका
▸ अमेरिकन लष्करी अळी (Fall Armyworm)
▸ खोड कीड -
फ्रेंच बिन्स
▸ शेंग पोखरणारी अळी
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸अळी वर्गातील किडींवर अत्यंत प्रभावी: हे प्रामुख्याने खोडकिडा, शेंगा पोखरणारी अळी, फळ पोखरणारी अळी आणि लष्करी अळी यांसारख्या सर्व प्रकारच्या अळ्यांवर उत्कृष्ट नियंत्रण देते.
▸दीर्घकालीन संरक्षण: एकदा फवारणी केल्यानंतर याचा प्रभाव १८ ते २१ दिवसांपर्यंत राहतो, ज्यामुळे पिकाला दीर्घकाळ संरक्षण मिळते.
▸वेगवान परिणाम: औषध पोटात जाताच कीटक अवघ्या काही मिनिटांत पिकाचे नुकसान करणे थांबवतात.
▸पावसाचा परिणाम कमी: फवारणीनंतर २ तासांनी पाऊस आला तरी याचा परिणाम कमी होत नाही (Rainfastness).
▸मित्र कीटकांना सुरक्षित: हे मधमाश्या, लेडीबर्ड बीटल आणि इतर फायदेशीर कीटकांना सुरक्षित आहे.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): Corprimaहे Group 28 गटातील आहे. किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील औषधांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): रासायनिक फवारणी सोबत प्रकाश सापळे (Light Traps) आणि कामगंध सापळे (Pheromone Traps) यांचा वापर करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या गटातील औषधांच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर (उदा. भात, ऊस, सोयाबीन, भाजीपाला) कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.