Crystal Blue Copper
Crystal Blue Copper
Crystal
Out of stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇
- मोफत घरपोच सेवा
- मार्केट पेक्षा कमी दर
- जलद घरपोच सेवा
Share

पर्यायी उत्पादने
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸ यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% डब्ल्यू.पी. (Copper Oxychloride 50% WP) Wettable Powder हा रासायनिक घटक असतो.
-
रासायनिक गट
▸इनऑरगॅनिक (Inorganic), कॉपर कंपाऊंड्स (Copper Compounds)
-
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: स्पर्शजन्य (Contact)
▸ स्पर्शजन्य असल्यामुळे हे फवारणीनंतर वनस्पतीमध्ये किंवा पानात शोषले जात नाही. त्याऐवजी, हे पानांच्या आणि वनस्पतीच्या पृष्ठभागावर घट्ट चिकटून राहते आणि एक 'संरक्षक थर' (Protective Layer) तयार करते, ज्यामुळे बुरशीचा आणि जिवाणूंचा (Bacteria) थेट संपर्क वनस्पतीशी येत नाही.
▸ क्रिया प्रकार: फक्त प्रतिबंधात्मक (Preventive)
▸ हे बुरशीनाशक बुरशीचे बीजाणू (Spores) अंकुरित होण्याआधीच नष्ट करते. हे बुरशीसोबतच 'बॅक्टेरिया' (जिवाणू) देखील मारते. त्यामुळे रोग येण्यापूर्वी किंवा पावसाळी वातावरण असताना वापरल्यास हे पिकाचे बुरशी आणि करपा रोगांपासून सर्वोत्तम प्रतिबंधात्मक संरक्षण करते.
▸ टिप : ब्लू कॉपर (Copper Oxychloride) मध्ये उपचारात्मक (Curative) गुणधर्म नसतात. म्हणजेच एकदा बुरशी वनस्पतीच्या पेशींमध्ये शिरली (Infection झाले), की हे बुरशीनाशक त्या बुरशीला आत जाऊन मारू शकत नाही. त्यामुळे याचा वापर रोग येण्याआधीच (Preventive) करणे सर्वात फायदेशीर ठरते. -
कार्यपद्धती
▸ कॉपर ऑक्सिक्लोराईड (Copper Oxychloride) हे 'बहु-स्थळी क्रिया करणारे' (Multi-site Action) गटातील स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे.
▸ हे बुरशीनाशक बुरशीच्या संपर्कात आल्यावर किंवा पाण्याच्या सानिध्यात आल्यावर त्यातून 'कॉपर आयन्स' (Cu++) मुक्त करते. हे आयन्स बुरशीच्या बीजाणूंमध्ये (Spores) शिरतात आणि तेथील विविध एन्झाइम्स (Enzymes) आणि प्रथिनांच्या (Proteins) रचनेवर हल्ला करतात. यामुळे प्रथिनांचे साकळणे (Coagulation) होते आणि एन्झाइम्सची कार्यक्षमता नष्ट होते. परिणामी, बुरशीची श्वसन क्रिया थांबते आणि ती मरते.
▸ या गटाला 'इनऑरगॅनिक कॉपर' (Inorganic Copper) फंगिसाइड असे म्हणतात.
(FRAC Group: M01) -
वापरण्याची पद्धत
फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
▸ फवारणीसाठी : 2 ग्रॅम प्रती लीटर
(copper oxychloride 50% WP हे जर जमीनितूनज दिले तर जमिनीतील जिवाणू निष्क्रिय होतील त्यामुळे आम्ही जमिनीतून रेकॉमेंड करत नाहीत.)
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग/किडी
-
कांदा
▸ जांभळा करपा (Purple blotch – Alternaria porri)
▸ अल्टरनारिया ठिपके -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सेप्टोरिया पानांवरील ठिपके -
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early blight – Alternaria solani)
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
❌ ब्लॅक स्कर्फ, कंदकुज – Copper प्रभावी नाही -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ अँथ्रॅकोज करपा (Colletotrichum)
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy mildew – preventive)
❌ भुरी (Powdery mildew) – प्रभावी नाही -
आले,हळद
▸ रायझोम कंदकुज (Pythium / Rhizoctonia – preventive drenching)
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा (Early blight)
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सेप्टोरिया पानांवरील ठिपके
❌ फ्युजारियम मर, भुरी – Copper प्रभावी नाही -
मिरची,ढोबळी मिरची
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
▸ कॉलर रॉट (preventive drenching) -
वांगे
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके -
भेंडी
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके -
गवार
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके -
कापूस
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ बियाणे कुज (seed treatment / soil surface protection) -
झेंडू
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ फुलकुज (Botrytis – preventive) -
शेवंती
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ फुलकुज (preventive) -
सोयाबीन
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ सेप्टोरिया तपकिरी ठिपके -
भुईमूग
▸ सरकोस्पोरा ठिपके (Early & Late leaf spot – preventive)
-
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके -
हरभरा
▸ अल्टरनारिया ठिपके
-
वाटाणा
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सरकोस्पोरा ठिपके
▸ डाऊनी मिल्ड्यू (preventive) -
भात
▸ तपकिरी ठिपके
▸ शीथ रॉट (preventive) -
गहू
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सेप्टोरिया ठिपके -
मका
▸ पानावरील ठिपके
-
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकोज करपा
▸ अल्टरनारिया ठिपके
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸ विस्तृत श्रेणीतील नियंत्रण (Broad Spectrum Control) – करपा (Anthracnose), डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew), पानावरील ठिपके (Leaf Spot), फळकूज आणि विशेषतः तेल्या / जीवाणूजन्य करपा (Bacterial Blight) यांसारख्या बुरशी व जिवाणूजन्य रोगांवर अत्यंत प्रभावी.
▸ स्पर्शजन्य क्रिया (Contact Action) – हे एक शक्तिशाली स्पर्शजन्य बुरशीनाशक व जिवाणूनाशक आहे. फवारणीनंतर हे पानांच्या व फळांच्या पृष्ठभागावर एक संरक्षक थर तयार करते. याच्या संपर्कात येताच बुरशीचे बीजाणू आणि जिवाणू नष्ट होतात.
▸ प्रतिबंधात्मक कार्य (Preventive Action) – हे प्रामुख्याने रोग येण्याआधी (Preventive) वापरण्याचे औषध आहे. हे बुरशीचे बीजाणू अंकुरण्याआधीच मारते, त्यामुळे रोगाचा प्रसार (Spread) सुरुवातीलाच थांबवला जातो.
▸ पोषक घटकांचा पुरवठा (Nutritional Value) – यामध्ये ५०% धातूयुक्त तांबे (Metallic Copper) असते. हे पिकाला 'कॉपर' या सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करते, ज्यामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पीक काटक बनते.
▸ WP स्वरूप (Wettable Powder) – हे निळ्या रंगाच्या पाण्यात मिसळणाऱ्या पावडर (WP) स्वरूपात उपलब्ध आहे. हे फवारणीसाठी तसेच मुळांवाटे होणाऱ्या बुरशीसाठी आळवणी (Drenching) करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
▸ रेझिस्टन्स मॅनेजमेंट (Resistance Fighter) – हे 'इनऑरगॅनिक' आणि 'मल्टी-साईट' (Multi-site) ॲक्शन असल्यामुळे बुरशीला किंवा जिवाणूंना याचा रेझिस्टन्स (प्रतिकारशक्ती) तयार करता येत नाही. उलट, हे इतर औषधांचा रेझिस्टन्स तोडण्यासाठी वापरले जाते.
-
क्रॉस रेझिस्टन्स' टाळणे (Avoid Cross-Resistance):
▸ शास्त्रीय कारण: ब्लू कॉपर हे 'इनऑरगॅनिक कॉपर' (FRAC Group M01) गटातील बुरशीनाशक आहे. जरी याच्या विरोधात रेझिस्टन्स येण्याची शक्यता अत्यंत कमी (Low Risk) असली, तरी सतत कॉपरचा वापर केल्यास जमिनीत तांब्याचे प्रमाण वाढू शकते आणि काही विशिष्ट जिवाणूंमध्ये (उदा. Xanthomonas) सहनशक्ती वाढू शकते.
▸ टीप: सतत फक्त ब्लू कॉपर किंवा इतर कॉपरयुक्त औषधे (उदा. कोसाईड/बोर्डो) वापरू नका. अधूनमधून 'कॅप्टन', 'मॅन्कोझेब' किंवा 'झिनेब' सारख्या वेगळ्या गटातील स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करा.'मोड ऑफ ॲक्शन' मध्ये बदल (Rotate Mode of Action):
▸ शास्त्रीय कारण: हे 'मल्टी-साईट' (Multi-site) बुरशीनाशक आहे. हे बुरशीच्या आणि जिवाणूंच्या प्रथिनांचे साकळणे (Protein Coagulation) करते आणि एन्झाइम्सची कार्यक्षमता नष्ट करते. बुरशीला स्वतःमध्ये बदल करून याला विरोध करणे कठीण असते.
▸ टीप: हे बुरशीनाशक एक उत्तम 'रोटेशन पार्टनर' आहे. जेव्हा तुम्ही आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशके (उदा. अॅलिएट किंवा मेटलॅक्झील) वापरता, तेव्हा मधल्या काळात ब्लू कॉपरची फवारणी घेतल्यास रेझिस्टन्स साखळी तुटते.'टँक मिक्स' धोरण (Tank Mix Strategy):
▸ शास्त्रीय कारण: ब्लू कॉपर हे अनेक प्रतिजैविकांसोबत (Antibiotics) उत्कृष्ट काम करते. विशेषतः जिवाणूजन्य रोगांवर (Bacterial Diseases) नियंत्रण मिळवण्यासाठी हे एकटे वापरण्यापेक्षा जिवाणूनाशकासोबत वापरणे जास्त प्रभावी ठरते.
▸ टीप: जिवाणूजन्य करपा (Bacterial Blight) किंवा तेल्या रोगासाठी ब्लू कॉपरसोबत नेहमी 'स्ट्रेप्टोसायक्लीन' (Streptocycline) किंवा 'कासुगामायसिन' (Kasugamycin) मिसळून फवारावे. यामुळे दुहेरी संरक्षण मिळते.वापराची वारंवारता (Frequency of Application):
▸ नियम: हे कमी धोक्याचे (Low Risk) बुरशीनाशक असले तरी, जास्त उष्णता असताना किंवा फुलोरा अवस्थेत याचा वापर टाळावा. हंगामात ३ ते ४ वेळा वापरणे सुरक्षित आहे.
▸ टीप: डाळिंब, लिंबूवर्गीय फळे आणि द्राक्ष बागेत छाटणीनंतर किंवा पावसाळ्यात बुरशी आणि जिवाणू यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याचा नियमित वापर करावा.उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):
▸ शास्त्रीय कारण: ब्लू कॉपर हे प्रामुख्याने 'स्पर्शजन्य' (Contact) आणि प्रतिबंधात्मक आहे. हे बुरशी आणि जिवाणूंचा प्रसार होण्याआधीच त्यांना मारते. एकदा बुरशी किंवा बॅक्टेरिया झाडाच्या आत शिरला की ब्लू कॉपर आत जाऊन त्यांना मारू शकत नाही.
▸ टीप: रोगाची लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका. विशेषतः पावसाळी हंगामात किंवा जखम झाली असल्यास (उदा. गारपीट झाल्यानंतर) रोग येण्यापूर्वीच (Preventive) याचा वापर करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):
▸ शास्त्रीय कारण: हे बुरशीनाशक पानामध्ये शोषले जात नाही, ते फक्त पृष्ठभागावर काम करते. जर फवारणी व्यवस्थित झाली नाही, तर राहिलेल्या जागेवरून बुरशी किंवा जिवाणू आत शिरू शकतात.
▸ टीप: फवारणी करताना पूर्ण झाड न्हाऊ घालणे गरजेचे आहे. पावसाळ्यात औषध पानावर टिकून राहण्यासाठी चांगल्या दर्जाचे 'सिलिकॉन स्टिकर' (Silicon Sticker) नक्की वापरा, कारण साध्या पाण्याने हे लवकर धुतले जाते.