Skip to product information
1 of 1

Crystal Bavistin

Crystal Bavistin

Crystal

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Crystal
उत्पादनाचे नाव Bavistin
वापरण्याची पद्धत फवारणी,आळवणी, ठिबक 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक Carbendazim 50% WP
रासायनिक गट Benzimidazoles 
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ यामध्ये कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू.पी. (Carbendazim 50% WP – Wettable Powder) हा रासायनिक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ बेंझिमिडाझोल (Benzimidazole )

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)

    ▸ आंतरप्रवाही असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आत मध्ये शोषले जाते व वनस्पतींच्या झायलम पेशींच्याद्वारे सर्व भागात पोहचते.

    ▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक

    ▸बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास प्रतिबंधात्मक (Preventive) आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीस उपचारात्मक (Curative) नियंत्रण देते.

    ▸ टिप : Carbendazim मध्ये eradicant action नसते.म्हणजेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढल्यानंतर हा fungicide fungus पूर्ण नष्ट करू शकत नाही.

  • कार्यपद्धती

    ▸ कार्बेन्डाझिम (Carbendazim) हे कोशिकाविभाजन अवरोधक (Cell Division Inhibitor) गटातील आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.

    ▸ हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशींमधील β-ट्युब्युलिन (β-tubulin) प्रथिनाशी संलग्न होते व त्यामुळे मायटोसिस (कोशिकाविभाजन) प्रक्रिया थांबते.यामुळे मायक्रोट्युब्युल्स तयार होत नाहीत, पेशी विभाजन होऊ शकत नाही आणि बुरशीची वाढ व प्रसार थांबतो. परिणामी बुरशीची वाढ हळूहळू खुंटते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी,आळवणी,ठिबक,बीजप्रक्रिया

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी :  1 ते 2 ग्रॅम प्रती लीटर
    ▸ आळवणीसाठी : 1 ते 2 ग्रॅम प्रती लीटर
    ▸ ठिबकसाठी : 500 ग्रॅम प्रती एकर

  • कांदा

    ▸ जांभळा करपा (सुरुवातीची अवस्था)
    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ फ्युजारियम मुळकुज (early stage)
    ▸ कंदकुज (सुरुवातीस)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सेप्टोरिया पानांवरील ठिपके
    ▸ फ्युजारियम रोपमर (nursery / early field stage)

  • बटाटा

    ▸ लवकर येणारा करपा (Early blight – early stage)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ कोरडी कंदकुज (seed / early storage stage)
    ▸ उगवणीतील कंदकुज
    ❌ Late blight – शिफारस नाही

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ अँथ्रॅकोज करपा (early stage)
    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ फ्युजारियम रोपमर (early)
    ❌ भुरी – शिफारस नाही

  • आले,हळद

    ▸ रायझोम कंदकुज (seed treatment / early drenching)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ कंदकुज (सुरुवातीची अवस्था)

  • टोमॅटो

    ▸ फ्युजारियम रोपमर (early)
    ▸ अँथ्रॅकोज करपा (early)
    ▸ लवकर येणारा करपा (Early blight)
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ❌ भुरी – शिफारस नाही

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ अँथ्रॅकोज करपा (early)
    ▸ फ्युजारियम रोपमर
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ कॉलर रॉट (early drenching stage)

  • वांगे

    ▸ फ्युजारियम रोपमर
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ अँथ्रॅकोज करपा (early)
    ▸ कॉलर रॉट (early)

  • भेंडी

    ▸ फ्युजारियम रोपमर
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ अँथ्रॅकोज करपा (early)
    ▸ कॉलर रॉट (early)

  • गवार

    ▸ फ्युजारियम रोपमर
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ अँथ्रॅकोज करपा (early)
    ▸ कॉलर रॉट (early)

  • कापूस

    ▸ फ्युजारियम रोपमर (early)
    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ बियाणे कुज (seed treatment)

  • झेंडू

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ फ्युजारियम मर (early)
    ▸ फुलकुज (early)

  • शेवंती

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ फ्युजारियम मर (early)
    ▸ फुलकुज (early)

  • सोयाबीन

    ▸ अँथ्रॅकोज करपा (early)
    ▸ सेप्टोरिया तपकिरी ठिपके
    ▸ फ्युजारियम मुळकुज
    ▸ फ्युजारियम बियाणे कुज

  • भुईमूग

    ▸ सरकोस्पोरा ठिपके (early)
    ▸ मुळकुज (early)
    ▸ बियाणे कुज

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके
    ▸ सारकोस्पोरा पोरा पानांवरील ठिपके
    ▸ फुजारियम मुळकुज

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ अँथ्रॅकोज करपा (early)
    ▸ अल्टरनेरीया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ फ्युजारियम मुळकुज
    ▸ बियाणे कुज

  • हरभरा

    ▸ फुजारियम मुळकुज
    ▸ अल्टरनेरीया ठिपके
    ▸ बियाणे कुज

  • वाटाणा

    ▸ अँथ्रॅकोज करपा (early)
    ▸ अल्टरनेरीया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ फ्युजारियम मुळकुज
    ▸ बियाणे कुज

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ अँथ्रॅकोज करपा (early)
    ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ फ्युजारियम रोपकुज (early)
    ▸ कॉलर रॉट (early)

  • भात

    ▸ तपकिरी ठिपके
    ▸ रोपकुज (nursery stage)
    ▸ कणीस कुज (early infection)
    ❌ शीथ रॉट – शिफारस नाही
    ▸उगवणीतील कुज

  • गहू

    ▸ सेप्टोरिया ठिपके
    ▸ अल्टरनेरीया ठिपके
    ▸ फ्युजारियम मुळकुज
    ▸ उगवणीतील कुज

  • मका

    ▸पानांवरील ठिपके
    ▸फुजारियम खोडकुज
    ▸फुजारियम मुळकुज

  • फ्रेंच बिन्स

    ▸अँथ्रॅकोज करपा
    ▸सारकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸फुजारियम मुळकुज
    ▸ अल्टरनेरीया ठिपके

  • ▸ विस्तृत श्रेणीतील नियंत्रण (Broad Spectrum Control) – करपा (Anthracnose), भुरी (Powdery Mildew), पानावरील ठिपके (Leaf Spot), फळकूज (Fruit Rot), मर रोग (Wilt) यांसारख्या विविध बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण.

    ▸ आंतरप्रवाही क्रिया (Systemic Action) – हे पूर्णपणे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. हे पानांवाटे आणि मुळांवाटे शोषले जाते आणि संपूर्ण पिकात पसरून रोगाचा सामना करते.

    ▸ दुहेरी कार्यपद्धती (Preventive & Curative) – हे प्रतिबंधात्मक (रोग येण्याआधी) आणि उपचारात्मक (रोग आल्यानंतर) अशा दोन्ही प्रकारे उत्कृष्ट काम करते.

    ▸ पिकाचा आरोग्य परिणाम (Phytotonic Effect) – याच्या फवारणीमुळे पिकावर हिरवेपणा येतो (Greening Effect) आणि पांढऱ्या मुळांच्या वाढीस चालना मिळते, ज्यामुळे पिक तजेलदार दिसते.

    ▸ WP स्वरूप (Wettable Powder) – हे पाण्यात मिसळणारी पावडर (WP) स्वरूपात उपलब्ध आहे, जे फवारणी आणि आळवणी (Drenching) साठी वापरणे सोपे आहे.

    ▸ दीर्घकाळ टिकणारे संरक्षण – आंतरप्रवाही असल्यामुळे हे पिकाला बुरशीपासून दीर्घकाळ संरक्षण देते.

  • 'क्रॉस रेझिस्टन्स' टाळणे (Avoid Cross-Resistance):

    शास्त्रीय कारण: कार्बेन्डाझिम आणि थिओफेनेट मिथाइल हे दोन्ही एकाच 'बेंझिमिडाझोल' (Benzimidazole - FRAC Group 1) गटातील बुरशीनाशके आहेत. त्यांची कार्यपद्धती १००% समान आहे. जर बुरशीने कार्बेन्डाझिम विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार केली, तर ती थिओफेनेट मिथाइलला सुद्धा आपोआप प्रतिकार करते.

    टीप: जर तुम्ही Carbendazim फवारणीसाठी वापरले असेल, तर त्यानंतरच्या फवारणीत Thiophanate Methyl वापरू नका. त्याऐवजी दुसऱ्या गटातील औषध वापरा.

    'मोड ऑफ ॲक्शन' मध्ये बदल (Rotate Mode of Action):

    शास्त्रीय कारण: हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशी विभाजनातील 'बीटा-ट्युबुलिन' (Beta-tubulin) तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते. जर याचा वारंवार वापर केला, तर बुरशी या प्रक्रियेला बायपास करायला शिकते आणि बुरशीनाशक काम करणे थांबवते.

    टीप: साखळी तोडण्यासाठी, पुढील फवारणीत 'ट्रायझोल' (उदा. स्कोअर/फॉलिक्युअर - गट ३) किंवा 'स्ट्रोबिल्युरिन' (उदा. अमिस्टार/कस्टोडिया - गट ११) गटातील बुरशीनाशक वापरावे.

    'टँक मिक्स' धोरण (Tank Mix Strategy - Multi-site Action):

    शास्त्रीय कारण: कार्बेन्डाझिम हे एक 'सिंगल साईट' (Single Site) बुरशीनाशक आहे. बुरशीला फक्त एकाच ठिकाणचा हल्ला परतवून लावायचा असल्याने ती लवकर रेझिस्टंट बनते.

    टीप: कार्बेन्डाझिम कधीही एकटे (Solo) वापरू नका. हे नेहमी 'मॅन्कोझेब' (M-45), 'झायनेब' किंवा 'कॅप्टन' सारख्या मल्टी-साईट बुरशीनाशकासोबत मिसळूनच वापरावे. यामुळे रिझल्ट वाढतो आणि रेझिस्टन्स येत नाही.

    वापराची वारंवारता (Frequency of Application):

    नियम: एका पिकाच्या हंगामात (Crop Season) हे बुरशीनाशक जास्तीत जास्त २ वेळा वापरावे.

    टीप: एका पाठोपाठ एक सलग (Sequential) दोन फवारण्या कार्बेन्डाझिमच्या घेऊ नयेत. मधल्या काळात स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर करावा.

    उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):

    शास्त्रीय कारण: कार्बेन्डाझिम हे बुरशीची वाढ रोखणारे बुरशीनाशक आहे. जेव्हा बुरशीची संख्या कमी असते, तेव्हा हे उत्तम काम करते. पण बुरशीची संख्या प्रचंड वाढल्यास रेझिस्टंट बुरशी तयार होण्याची शक्यता वाढते.

    टीप: रोगाची लक्षणे दिसताच किंवा ढगाळ वातावरण असताना रोग येण्यापूर्वीच (Preventive) याचा वापर करावा. 'लेट स्टेज' मध्ये याचा वापर टाळावा.

    योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):

    शास्त्रीय कारण: जर डोस कमी पडला (Sub-lethal dose), तर कमकुवत बुरशी मरते पण सशक्त (Mutated) बुरशी जिवंत राहते आणि आपली नवीन, बुरशीनाशकला न जुमानणारी पिढी तयार करते.

    टीप: नेहमी शिफारस केलेला डोस (१ ते २ ग्रॅम प्रति लिटर - पिकानुसार) वापरावा आणि फवारणी करताना पूर्ण झाड व्यवस्थित भिजेल याची काळजी घ्यावी.