Skip to product information
1 of 1

Crystal Apex-50

Crystal Apex-50

Crystal

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

   Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Crystal Crop Protection
उत्पादनाचे नाव Apex-50
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Fipronil 3.50% SC+
Emamectin Benzoate 1.50%
रासायनिक गट Phenylpyrazole+
Avermectin
कीटकनाशक प्रकारस्पर्शजन्य+
आंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸यामध्ये एमामेक्टिन बेंझोएट १.५०% + फिप्रोनिल ३.५०% एस.सी. (Emamectin Benzoate 1.50% + Fipronil 3.50% SC) हे रासायनिक घटक असतात. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पांढऱ्या रंगाचे दाट प्रवाही द्रव स्वरूप (Suspension Concentrate) आहे.

  • रासायनिक गट

    ▸हे एव्हरमेक्टिन (Avermectin) आणि फिप्रोल (Fiprole / Phenylpyrazole) या दोन वेगवेगळ्या रासायनिक गटांचे मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸हे एक संयुक्त (Combination) स्पर्शजन्य, पोटविष आणि आंतरप्रवाही गुणधर्म असलेले आधुनिक कीटकनाशक आहे.

  • कीटकनाशक प्रवेश मार्ग

    ▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच कीटकांनी फवारणी केलेले पानांचे भाग खाल्ल्यास किंवा रस शोषल्यास हे त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करून तीव्र विषबाधा करते (Stomach Action).

  • कार्यपद्धती

    ▸हे दुहेरी पद्धतीने कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. फिप्रोनिल मध्यवर्ती मज्जासंस्थेतील संदेशवहन विस्कळीत करते, तर एमामेक्टिन बेंझोएट स्नायूंच्या आकुंचनावर परिणाम करून कीटकाला अर्धांगवायू करते. यामुळे कीटक हालचाल व अन्न खाणे त्वरित बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.

  • वापरण्याची पद्धत

    ▸फवारणी.

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸फवारणी : २ मिली प्रती लीटर पाणी.
    ▸एकरी प्रमाण : ४०० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).

  • कांदा

    ▸ फुलकिडे (Thrips)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ हिरापुतळी अळी (DBM)
    ▸ पाने खाणारी अळी

  • बटाटा

    ▸ तुडतुडे
    ▸ पाने खाणारी अळी

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ फळमाशी
    ▸ तांबडे भुंगेरे (Red Pumpkin Beetle)
    ▸ फुलकिडे

  • आले,हळद

    ▸ खोड किडा/अळी
    ▸ फुलकिडे

  • टोमॅटो

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ नागअळी (Leaf Miner)
    ▸ फुलकिडे

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ फुलकिडे (Thrips)
    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ कोळी (Mites) वर अंशतः नियंत्रण

  • वांगे

    ▸ शेंडा आणि फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • भेंडी

    ▸ फळ पोखरणारी अळी
    ▸ तुडतुडे

  • गवार

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ रसशोषक कीड

  • कापूस

    ▸ बोंड अळी (हिरवी, ठिपक्यांची)
    ▸ फुलकिडे, तुडतुडे

  • झेंडू

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ कळी पोखरणारी अळी

  • शेवंती

    ▸ पाने खाणारी अळी
    ▸ कळी पोखरणारी अळी

  • सोयाबीन

    ▸ पाने खाणारी अळी (Spodoptera)
    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ चक्रभुंगा (Girdle Beetle)

  • भुईमूग

    ▸ पाने गुंडाळणारी अळी
    ▸ उपसा (Thrips)

  • वाल घेवडा 

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ फुलकिडे

  • हरभरा

    ▸ घाटा अळी (Pod Borer)

  • वाटाणा

    ▸ घाटा अळी (Pod Borer)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ फुलकिडे
    ▸ फळमाशी
    ▸ पाने खाणारी अळी

  • भात

    ▸ खोड किडा
    ▸ पाने गुंडाळणारी अळी

  • गहू

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
    ▸ खोड किडा

  • मका

    ▸ लष्करी अळी (Fall Armyworm)
    ▸ खोड किडा

  • फ्रेंच बिन्स

    ▸ शेंगा पोखरणारी अळी
    ▸ रसशोषक कीड


  • ▸बहुआयामी नियंत्रण: हे एकाच वेळी सर्व प्रकारच्या अळ्या (उदा. लष्करी अळी, फळ पोखरणारी अळी) आणि रसशोषक किडी (उदा. थ्रिप्स, तुडतुडे) यांच्यावर उत्कृष्ट नियंत्रण देते.
    ▸उत्कृष्ट आंतरप्रवाही गुणधर्म: हे झाडाच्या पानांद्वारे लवकर शोषले जाते आणि झाडाच्या सर्व भागांत पसरते, त्यामुळे लपलेल्या किडींचाही नाश होतो.
    ▸पीक वाढीसाठी पोषक: याच्या वापरामुळे पिकाची प्रतिकारशक्ती वाढते आणि पीक हिरवेगार राहण्यास मदत होते (Plant Health Effect).
    ▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे प्रामुख्याने मिरची, कपाशी, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांवर वापरण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
    ▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.

  • ▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): अपेक्स-५० हे Group 6 आणि Group 2 चे मिश्रण आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
    ▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
    ▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि पिवळे/निळे चिकट सापळे वापरावेत.
    ▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
    ▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.