Corteva Transform
Corteva Transform
Corteva Agriscience
Out of stock
Couldn't load pickup availability
a
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
ट्रान्सलॅमिनार
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
- मोफत घरपोच सेवा
- मार्केट पेक्षा कमी दर
- जलद घरपोच सेवा
Share
पर्यायी उत्पादने
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये सल्फोक्झाफ्लोर २१.८% एस.सी. (Sulfoxaflor 21.8% SC) हा रासायनिक घटक असतो. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पांढऱ्या रंगाचे दाट प्रवाही द्रव स्वरूप (Suspension Concentrate) आहे.
-
रासायनिक गट
▸हे 'सल्फॉक्सिमाइन' (Sulfoximines) या नवीन रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक रासायनिक आंतरप्रवाही (Systemic) आणि ट्रान्सलॅमिनार (Translaminar) गुणधर्म असलेले कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action). यात पानांच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्याची क्षमता असल्याने लपलेल्या किडींचेही नियंत्रण होते.
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या निकोटीनिक ॲसिटिलकोलिन रिसेप्टर्स (nAChR) च्या एका विशिष्ट जागेवर कार्य करते, ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन विस्कळीत होते. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो, कीटक अन्न खाणे बंद करतात आणि परिणामी त्यांचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : ०.७५ मिली ते १ मिली प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : १५० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग/किडी
-
कांदा
▸ फुलकिडे (Thrips)
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ मावा (Aphids)
▸ पांढरी माशी (Whitefly) -
बटाटा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
आले,हळद
▸ तुडतुडे
▸ फुलकिडे (Thrips) -
टोमॅटो
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ फुलकिडे (Thrips) -
वांगे
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
भेंडी
▸ तुडतुडे (Jassids)
▸ मावा (Aphids) -
गवार
▸ तुडतुडे
▸ मावा -
कापूस
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पिठ्या ढेकुण (Mealybug) -
झेंडू
▸ मावा (Aphids)
▸ फुलकिडे (Thrips) -
शेवंती
▸ मावा (Aphids)
▸ फुलकिडे (Thrips) -
सोयाबीन
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
भुईमूग
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
वाल घेवडा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ फुलकिडे (Thrips) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ फुलकिडे (Thrips) -
हरभरा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ फुलकिडे (Thrips) -
वाटाणा
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ फुलकिडे (Thrips) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे (Jassids) -
भात
▸ तपकिरी तुडतुडे (Brown Plant Hopper - BPH)
▸ हिरवे तुडतुडे (Green Leaf Hopper - GLH) -
गहू
▸ मावा (Aphids)
-
मका
▸ मावा (Aphids)
-
फ्रेंच बिन्स
▸ मावा (Aphids)
▸ पांढरी माशी
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸प्रतिकारशक्ती तोडणारे: हे पारंपारिक निओनिकोटीनोइड्स गटाला प्रतिकार करणाऱ्या किडींवर (उदा. तुडतुडे) उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
▸रसशोषक किडींवर तज्ज्ञ: हे प्रामुख्याने कापसातील मावा, तुडतुडे आणि भातावरील तांबड्या व तपकिरी तुडतुड्यांवर (BPH) प्रभावी आहे.
▸जलद कार्यक्षमता: फवारणीनंतर काही तासांतच किडींचे नुकसान थांबते.
▸कमी डोस, जास्त परिणाम: आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी प्रमाणात वापरूनही हे दीर्घकाळ पिकाचे संरक्षण करते.
▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): ट्रान्सफॉर्म हे Group 4C गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा. पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील कीटकनाशक वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता चिकट सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.