Skip to product information
1 of 1

PI Sectin

PI Sectin

PI

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Bayer
उत्पादनाचे नाव Sectin
वापरण्याची पद्धत फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Fenamidone 10%+
Mancozeb 50% WG
रासायनिक गट Imidazolinones +
Dithiocarbamates
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही +
संपर्कजन्य

🎥 उत्पादन व्हिडिओ

Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ फेनॅमिडोन १०% + मॅन्कोझेब ५०% डब्लू.जी.
    (Fenamidone 10% + Mancozeb 50% WG)

  • रासायनिक गट

    ▸ क्विनोन आउटसाइड इनहिबिटर (QoI) + डायथिओकार्बामेट्स
    (Quinone outside Inhibitors - Imidazolinones + Dithiocarbamates)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
    ▸ बुरशीनाशक प्रकार: प्रगत आंतरप्रवाही + संपर्कजन्य (Systemic + Contact)
    ▸ यामधील फेनॅमिडोन (Fenamidone) हे एक आधुनिक आंतरप्रवाही औषध आहे. यात 'ट्रान्सलॅमिनर' गुणधर्म आहे, ज्यामुळे औषध पानाच्या वरच्या बाजूने खालच्या बाजूला सहज पोहोचते. हे बुरशीच्या सर्व अवस्थांना (बीजाणूपासून ते बुरशीच्या वाढीपर्यंत) रोखण्यास सक्षम आहे.
    ▸ यामधील मॅन्कोझेब (Mancozeb) हे जागतिक स्तरावर गाजलेले संपर्कजन्य बुरशीनाशक आहे. ते पानांच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक थर तयार करून बुरशीला पानात शिरकाव करण्यापासून रोखते.
    👉 सेक्टिनमध्ये उत्कृष्ट 'रेनफास्टनेस' आहे, म्हणजेच फवारणीनंतर लवकर पाऊस आला तरी याची परिणामकारकता टिकून राहते.

    ▸ क्रिया प्रकार: प्रामुख्याने प्रतिबंधात्मक (Preventive) + उपचारात्मक (Curative).
    ▸ रोग येण्यापूर्वी वापरल्यास हे १००% प्रतिबंध करते आणि रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसताच वापरल्यास बुरशीचा प्रसार त्वरित थांबवते.

  • कार्यपद्धती

    ▸ मॅन्कोझेब (Mancozeb): हे संपर्कजन्य (Multi-site) बुरशीनाशक आहे. ते बुरशीच्या पेशींमधील एन्झाईम्सवर हल्ला करून त्यांची ऊर्जा निर्मिती आणि श्वसन प्रक्रिया कायमची बंद करते.
    ▸ फेनॅमिडोन (Fenamidone): हे बुरशीच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया'मध्ये ऊर्जेचे वहन (Electron Transport Chain) खंडित करते. ऊर्जा निर्मिती थांबल्यामुळे बुरशीचे बीजाणू (Zoospores) अंकुरणे आणि हालचाल करणे थांबवतात.
    👉 या दोन घटकांमुळे बुरशीला स्वतःचे अस्तित्व टिकवणे कठीण जाते.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ फवारणीसाठी: २ ग्रॅम ते २.५ ग्रॅम प्रति लीटर पाणी.
    ▸ एकरी वापर: ४०० ग्रॅम ते ५०० ग्रॅम प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).

  • कांदा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ जांभळा करपा (Purple Blotch)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)

  • बटाटा

    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • आले,हळद

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ कंदकुज (Rhizome Rot - Preventive)

  • टोमॅटो

    ▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
    ▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
    ▸ फळकुज (Fruit Rot)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)

  • वांगे

    ▸ फळकुज (Phomopsis Blight)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)

  • भेंडी

    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)

  • गवार

  • कापूस

    ▸ दहिया रोग (Grey Mildew)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)

  • झेंडू

    ▸ करपा (Blight)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • शेवंती

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)

  • सोयाबीन

    ▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • भुईमूग

    ▸ टिक्का रोग (Tikka Disease)
    ▸ तांबेरा (Rust)

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
    ▸ तांबेरा (Rust)

  • हरभरा

    ▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
    ▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Blight)

  • वाटाणा

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ तांबेरा (Rust)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)

  • भात

    ▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration)

  • गहू

    ▸ तांबेरा (Rust)
    ▸ पानांवरील करपा (Leaf Blight)

  • मका

    ▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
    ▸ तांबेरा (Rust)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
    ▸ तांबेरा (Rust)

    • केवडा आणि करपा तज्ज्ञ: हे विशेषतः डाउनी मिल्ड्यू (Downy Mildew) आणि लेट ब्लाइट (Late Blight) या दोन अत्यंत घातक रोगांवर प्रभावी आहे.
    • बीजाणू प्रतिबंध (Spore Control): हे बुरशीचे बीजाणू तयार होणे आणि ते हवेमार्फत पसरणे थांबवते, ज्यामुळे रोगाचा प्रसार इतर झाडांवर होत नाही.
    • पिकावर तजेला: यामध्ये मॅन्गेनीज आणि झिंक असल्यामुळे पिकाला हिरवेगारपणा येतो.
    • क्लिष्ट हवामानात प्रभावी: सततचा पाऊस किंवा जास्त आर्द्रता असतानाही सेक्टिन आपले काम चोख बजावते.
    • सुरक्षितता: हे मणी सेटिंग किंवा फूल धारणा अवस्थेत वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
  • 'दुहेरी' सुरक्षा चक्र:
    शास्त्रीय कारण: फेनॅमिडोन हे 'सिंगल-साइट' (FRAC Group 11) औषध आहे, ज्याविरुद्ध बुरशीमध्ये प्रतिकारशक्ती येऊ शकते. मात्र, यात मॅन्कोझेब (Multi-site) हे घटक ५०% प्रमाणात असल्यामुळे बुरशीला 'रेझिस्टन्स' तयार करण्याची संधी मिळत नाही.
    टीप: चांगल्या व्यवस्थापनासाठी एका हंगामात सेक्टिनच्या २ पेक्षा जास्त फवारण्या करू नका.
    स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही संगम:
    शास्त्रीय कारण: मॅन्कोझेब बाहेरून ढाल बनवते, तर फेनॅमिडोन पानाच्या आत शिरून शत्रूचा नाश करते.
    टीप: द्राक्ष छाटणीनंतर १५ ते २५ दिवसांच्या दरम्यान किंवा ढगाळ वातावरणात केवडा रोखण्यासाठी हे 'हुकमी अस्त्र' आहे.