BASF Exponus
BASF Exponus
BASF
Out of stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
जठर विष
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
- मोफत घरपोच सेवा
- मार्केट पेक्षा कमी दर
- जलद घरपोच सेवा
Share
पर्यायी उत्पादने
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये ब्रोफ्लॅनीलाईड ३०० ग्रॅम/लीटर (Broflanilide 300 g/l SC) हा रासायनिक घटक असतो. जो SC स्वरूपात असतो. SC म्हणजे पाण्यात मिसळणारे घट्ट द्रावण स्वरूप (Suspension Concentrate) आहे.
-
रासायनिक गट
▸हे मेटा-डायनामाइड्स (Meta-diamides) या नवीन आणि प्रगत रासायनिक गटातील कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक आधुनिक आणि अत्यंत प्रभावी स्पर्शजन्य व जठर विष (Contact and Stomach Action) असलेले कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणीनंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच जेव्हा कीटक या औषधाची फवारणी झालेली पाने खातात, तेव्हा ते त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे कीटकांच्या GABA रिसेप्टर्सना वेगळ्या पद्धतीने बांधले जाते (GABA-gated chloride channel allosteric modulators), ज्यामुळे मज्जासंस्थेतील संदेशवहन पूर्णपणे विस्कळीत होते. यामुळे कीटकांना त्वरित आकडी येते, त्यांची हालचाल व खाणे बंद होते आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : ०.१७ मिली ते ०.२५ मिली प्रती लीटर पाणी (किडीच्या तीव्रतेनुसार).
▸एकरी प्रमाण : ३४ मिली ते ५० मिली प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग/किडी
-
कांदा
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
-
बटाटा
-
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
-
आले,हळद
-
टोमॅटो
-
मिरची,ढोबळी मिरची
-
वांगे
-
भेंडी
-
गवार
-
कापूस
-
झेंडू
-
शेवंती
-
सोयाबीन
-
भुईमूग
-
वाल घेवडा
-
मटकी,मुग,चवळी,उडीद
-
हरभरा
-
वाटाणा
-
कलिंगड,खरबूज,डांगर
-
भात
-
गहू
-
मका
-
फ्रेंच बिन्स
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸कठीण किडींवर मात: हे प्रामुख्याने लष्करी अळी (Fall Armyworm), थ्रिप्स (Thrips) आणि फळ पोखरणाऱ्या अळ्यांसारख्या जुन्या औषधांना दाद न देणाऱ्या किडींवर अत्यंत प्रभावी आहे.
▸वेगवान कार्य (Quick Knockdown): हे औषध फवारल्यापासून अतिशय कमी वेळात कीड मारण्याचे काम सुरू करते.
▸नवीन तंत्रज्ञान: ज्या किडींमध्ये इतर औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे, अशा किडींना मारण्यासाठी हे उत्तम पर्याय आहे.
▸कमी डोसमध्ये जास्त परिणाम: अत्यंत कमी प्रमाणात वापरूनही हे दीर्घकाळ पिकाचे संरक्षण करते.
▸सर्व पिकांसाठी उपयुक्त: कपाशी, मिरची, मका, सोयाबीन आणि टोमॅटो यांसारख्या पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी हे विशेषतः वापरले जाते.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): एक्स्पोनस हे Group 30 गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून पुढच्या फवारणीसाठी वेगळ्या रासायनिक गटातील (उदा. Group 28 किंवा 5) औषध वापरावे.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस अत्यंत कमी असल्याने तो मोजून आणि अचूक प्रमाणातच घ्यावा. अयोग्य डोसमुळे किडीमध्ये प्रतिकारशक्ती वाढू शकते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रसायनांवर अवलंबून न राहता कामगंध सापळे आणि शेतीतील इतर जैविक पद्धतींचा वापर करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात याची जास्तीत जास्त २ वेळा फवारणी करावी.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असू शकते, त्यामुळे पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.