Amistar Top
Amistar Top
Syngenta
Out of stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Triazoles
+ ट्रान्सलॅमिनर
🎥 उत्पादन व्हिडिओ
Amistar वापराचे फायदे जाणून घ्या 👇
- मोफत घरपोच सेवा
- मार्केट पेक्षा कमी दर
- जलद घरपोच सेवा
Share

पर्यायी उत्पादने
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
ॲझोक्सिस्ट्रोबिन १८.२% (Azoxystrobin 18.2% w/w) +डायफेनोकोनॅझोल ११.४% (Difenoconazole 11.4% w/w) SC
-
रासायनिक गट
▸ स्ट्रॉबिल्युरिन्स + ट्रायझोल्स
(Strobilurins + Triazoles) -
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
बुरशीनाशक प्रकार: पूर्णपणे आंतरप्रवाही + ट्रान्सलॅमिनर (Systemic + Translaminar)
यामध्ये दोन आंतरप्रवाही घटक असल्यामुळे, फवारणी केल्यानंतर ते पानांद्वारे अतिशय वेगाने शोषले जाते. 'झायलम' पेशींद्वारे ते वनस्पतीच्या शेंड्यापर्यंत (Acropetal movement) पोहोचते, ज्यामुळे नवीन येणाऱ्या फुटीलाही संरक्षण मिळते.
ट्रान्सलॅमिनर क्रियेमुळे औषध पानाच्या वरच्या भागावरून खालच्या भागापर्यंत सहज पोहोचते.
क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक (Preventive) + उपचारात्मक (Curative). -
कार्यपद्धती
ॲझोक्सिस्ट्रोबिन: हे बुरशीच्या पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया'मध्ये ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया थांबवते. ऊर्जा न मिळाल्यामुळे बुरशीचे बीजाणू अंकुरणे (Spore germination) जागीच थांबते.
डायफेनोकोनॅझोल: हे बुरशीच्या पेशींमधील 'एर्गोस्टेरॉल' संश्लेषणात अडथळा आणते. यामुळे बुरशीची वाढ (Mycelial growth) थांबते आणि बुरशी नष्ट होते. -
वापरण्याची पद्धत
फवारणी
-
वापरण्याचे प्रमाण
फवारणीसाठी: १ मिली प्रति लीटर पाणी.
एकरी डोस: २०० मिली प्रति एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग/किडी
-
कांदा
▸ जांभळा करपा (Purple Blotch)
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ देठ कुज (Neck Blight) -
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ रिंग स्पॉट (Ring Spot) -
बटाटा
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight) -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
आले,हळद
▸ पानांवरील करपा (Leaf Blight)
▸ ठिपके (Leaf Spot) -
टोमॅटो
▸ लवकर येणारा करपा (Early Blight)
▸ उशिरा येणारा करपा (Late Blight)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ फळकुज (Fruit Rot) -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फळकुज / डाय बॅक (Anthracnose / Dieback)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
वांगे
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Spot)
▸ फळकुज (Fruit Rot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
भेंडी
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ पानावरील करपा (Leaf Blight) -
गवार
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot) -
कापूस
▸ अल्टरनारिया ठिपके (Alternaria Leaf Spot)
▸ दहिया रोग (Grey Mildew)
▸ पानांवरील लाल ठिपके -
झेंडू
▸ करपा (Blight)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
शेवंती
▸ तांबेरा (Rust)
▸ पानांवरील ठिपके (Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew) -
सोयाबीन
▸ तांबेरा (Rust)
▸ शेंगावरील करपा (Pod Blight)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot) -
भुईमूग
▸ टिक्का रोग (Tikka Disease / Leaf Spot)
▸ तांबेरा (Rust)
▸ देठकुज (Stem Rot) -
वाल घेवडा
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust) -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ सरकोस्पोरा ठिपके (Cercospora Leaf Spot)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
हरभरा
▸ एस्कोकायटा ब्लाइट (Ascochyta Blight)
▸ तांबेरा (Rust) -
वाटाणा
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ तांबेरा (Rust) -
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose) -
भात
▸ शेंगावरील करपा (Sheath Blight)
▸ करपा (Blast)
▸ दाण्यांवरील ठिपके (Grain Discoloration) -
गहू
▸ तांबेरा (Rust)
▸ भुरी (Powdery Mildew)
▸ करपा (Blight) -
मका
▸ तुसावरील करपा (Turcicum Leaf Blight)
▸ तांबेरा (Rust) -
फ्रेंच बिन्स
▸ अँथ्रॅकनोज (Anthracnose)
▸ तांबेरा (Rust)
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
- ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण: हे प्रामुख्याने भूरी (Powdery Mildew), करपा (Anthracnose/Blight) आणि पानावरील ठिपके (Leaf Spots) यांवर अत्यंत प्रभावी आहे.
- पिकाचा आरोग्य परिणाम (Greening Effect): याच्या वापरामुळे पिकात हरितद्रव्य वाढते, पाने गडद हिरवी होतात आणि झाड जोमदार दिसते.
- चकाकी आणि गुणवत्ता: फळांची गुणवत्ता, आकार आणि चकाकी वाढवण्यासाठी हे औषध जगभरात प्रसिद्ध आहे.
- दीर्घकालीन संरक्षण: एकदा फवारणी केल्यावर १० ते १४ दिवसांपर्यंत पिकाला कडक सुरक्षा मिळते.
-
'मोड ऑफ ॲक्शन' मध्ये बदल (Rotate Mode of Action):
शास्त्रीय कारण: यात दोन वेगवेगळ्या कार्यपद्धतीचे (Group 11 + Group 3) घटक आहेत. तरीही, बुरशीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून सलग दोन फवारण्या अमिस्टार टॉपच्या करू नयेत.
टीप: साखळी तोडण्यासाठी पुढील फवारणीत 'मल्टी-साइट' (उदा. कवच किंवा मॅन्कोझेब) किंवा वेगळ्या गटाचे बुरशीनाशक वापरावे.
योग्य डोस आणि कव्हरेज:
शास्त्रीय कारण: कमी डोस वापरल्यास बुरशीमध्ये औषधाला पचवण्याची ताकद निर्माण होते.
टीप: नेहमी शिफारस केलेला डोस (१ मिली/लीटर) वापरावा आणि संपूर्ण झाड ओले होईल याची काळजी घ्यावी.