Skip to product information
1 of 1

Adama Mirador

Adama Mirador

Adama

Regular price Rs. 0.00 INR
Regular price Sale price Rs. 0.00 INR
Sale Sold out
Quantity

Out of stock

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव Adama  
उत्पादनाचे नाव Mirador
वापरण्याचा प्रकार फवारणी 

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक  Azoxystrobin 23% SC 
रासायनिक गट Strobilurins
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही  +
ट्रान्सलॅमिनर 

🎥 उत्पादन व्हिडिओ

Amistar वापराचे फायदे जाणून घ्या 👇

  • मोफत घरपोच सेवा
  • मार्केट पेक्षा कमी दर
  • जलद घरपोच सेवा
View full details
  • रासायनिक घटक

    ▸ यामध्ये ॲझॉक्सिस्ट्रोबिन 23% एस.सी. (Azoxystrobin 23% SC Suspension Concentrate) हा रासायनिक घटक असतो.

  • रासायनिक गट

    ▸ स्ट्रोबिल्यूरिन (Strobilurins)

  • बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

    ▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही व ट्रान्सलॅमिनर (Systemic + Translaminar)

    ▸ आंतरप्रवाही असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आत मध्ये शोषले जाते व वनस्पतींच्या झायलम पेशींच्याद्वारे सर्व भागात पोहचते.

    ▸ ट्रान्सलॅमिनर असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर पानांच्या वरच्या भागाद्वारे शोषले जाते व पानांच्या खालच्या बाजूला झिरपते. व पानाच्या दोन्ही बाजूला बुरशीजन्य रोगापासून संरक्षण देते.

    ▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक

    ▸बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास प्रतिबंधात्मक (Preventive) आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीस उपचारात्मक (Curative) नियंत्रण देते.

    ▸ टिप : Azoxystrobin मध्ये eradicant action नसते.म्हणजेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढल्यानंतर हा fungicide fungus पूर्ण नष्ट करू शकत नाही.

  • कार्यपद्धती

    ▸ॲझॉक्सिस्ट्रोबिन हे श्वसनक्रिया अवरोधक (Respiration Inhibitor) गटातील आहे.

    ▸हे बुरशीनाशक बुरशीच्या मायटोकॉन्ड्रिया मधील श्वसनसाखळीत अडथळा आणते. परिणामी बुरशी च्या पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती होत नाही त्यामुळे पेशींना ऊर्जा (ATP) मिळत नाही आणि बुरशीचा नाश होतो. याला क्विनोन आउटसाइड इनहिबिटर (QoI) असेही म्हणतात.

  • वापरण्याची पद्धत

    ▸ फवारणी (Foliar Spray)

  • वापरण्याचे प्रमाण

    ▸ प्रमाण : 0.75 ml ते 1 ml प्रती लीटर

  • कांदा

    ▸ जांभळा करपा
    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (early stage)

  • कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज 

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सेप्टोरिया पानांवरील ठिपके
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (early stage)

  • बटाटा

    ▸ लवकर येणारा करपा (Early blight)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ उशीरा येणारा करपा (Late blight – early stage)

  • काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (early stage)
    ▸ भुरी (secondary control)

  • आले,हळद

    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ पानांवरील करपा
    ▸ रायझोम रॉट (secondary / early stage)

  • टोमॅटो

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ लवकर येणारा करपा (Early blight)
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ उशीरा येणारा करपा (Late blight – early stage)
    ▸ भुरी (secondary)

  • मिरची,ढोबळी मिरची

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ भुरी (secondary)

  • वांगे

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ भुरी (secondary)

  • भेंडी

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके

  • गवार

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके

  • कापूस

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ रस्ट (secondary control)

  • झेंडू

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ ग्रे मोल्ड (Botrytis – early stage)

  • शेवंती

    ▸ अल्टरनारिया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ ग्रे मोल्ड (Botrytis – early stage)

  • सोयाबीन

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ सेप्टोरिया तपकिरी ठिपके
    ▸ रस्ट (secondary)

  • भुईमूग

    ▸ अर्ली लीफ स्पॉट
    ▸ लेट लीफ स्पॉट
    ▸ रस्ट (secondary control)

  • वाल घेवडा 

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके

  • मटकी,मुग,चवळी,उडीद

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनेरीया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ रस्ट (secondary)

  • हरभरा

    ▸ अल्टरनेरीया ठिपके
    ▸ अँथ्रॅकोज (secondary)

  • वाटाणा

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनेरीया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ भुरी (secondary)

  • कलिंगड,खरबूज,डांगर

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके
    ▸ सरकोस्पोरा ठिपके
    ▸ डाऊनी मिल्ड्यू (early stage)
    ▸ भुरी (secondary)

  • भात

    ▸ करपा / ब्लास्ट (secondary)
    ▸ तपकिरी ठिपके

  • गहू

    ▸ अल्टरनेरीया ठिपके
    ▸ सेप्टोरिया ठिपके
    ▸ रस्ट (secondary)

  • मका

    ▸ पानांवरील ठिपके
    ▸ रस्ट (secondary)

  • फ्रेंच बिन्स

    ▸ अँथ्रॅकोज करपा
    ▸ अल्टरनेरीया ठिपके
    ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
    ▸ रस्ट (secondary)

  • ▸विस्तृत श्रेणीतील नियंत्रण – Mildew, Blight, Mold,Rust,Leaf Spot इत्यादि प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण.

    ▸आंतरप्रवाही आणि ट्रान्सलॅमिनर क्रिया – वनस्पतीच्या आतून व पानांच्या दोन्ही बाजूंवर प्रभावी संरक्षण.

    ▸उत्कृष्ट प्रतिबंधात्मक क्रिया – बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त.

    ▸पिकाचा आरोग्य परिणाम (Phytotonic Effect) – पाने हिरवीगार व रुंद,पसरट होतात.

    ▸एस.सी. स्वरूप – द्रव असल्याने वापरणे सोपे.

    ▸दीर्घकाळ टिकणारे संरक्षण.

  • 'क्रॉस रेझिस्टन्स' टाळणे (Avoid Cross-Resistance):
    ▸ शास्त्रीय कारण: अझॉक्सिस्ट्रोबिन हे 'स्ट्रोबिल्युरिन' (FRAC Group 11) गटातील बुरशीनाशक आहे. या गटातील इतर बुरशीनाशके (उदा. पायराक्लोस्ट्रोबिन - कॅब्रिओ टॉप, ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबिन - नॅटिव्हो) यांची कार्यपद्धती समान आहे. जर बुरशीने अमिस्टार विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार केली, तर ती याच गटातील इतर औषधांनाही दाद देत नाही (Cross Resistance).
    ▸ टीप: जर अमिस्टारचा रिझल्ट येत नसेल, तर लगेच त्याचा वापर थांबवा. पुढील फवारणीत 'कॅब्रिओ टॉप' किंवा 'नॅटिव्हो' वापरू नका. त्याऐवजी तात्पुरते या गटाचे वापर बंद करून पूर्णपणे वेगळ्या गटाचे औषध वापरा.

    'मोड ऑफ ॲक्शन' मध्ये बदल (Rotate Mode of Action):
    ▸ शास्त्रीय कारण: हे बुरशीनाशक बुरशीच्या 'श्वसन प्रक्रियेत' (Energy Production) एका विशिष्ट ठिकाणी अडथळा आणते. सतत वापरल्यास बुरशी जनुकांमध्ये (Genes) बदल करून याला विरोध करते.
    ▸ टीप: साखळी तोडण्यासाठी, पुढील फवारणीत 'ट्रायझोल' (गट ३ - उदा. स्कोअर, टिल्ट) किंवा 'मल्टी साईट' (उदा. M-45, क्लोरोथॅलोनिल) बुरशीनाशक वापरावे. अमिस्टारचा रिझल्ट न आल्यास पुन्हा डोस वाढवून फवारणी करू नका.

    'टँक मिक्स' धोरण (Tank Mix Strategy - Multi-site Action):
    ▸ शास्त्रीय कारण: अझॉक्सिस्ट्रोबिन हे 'सिंगल साईट' (Single Site) बुरशीनाशक असल्याने हाय रिस्क आहे. मल्टी-साईट बुरशीनाशके बुरशीवर अनेक ठिकाणांवरून एकाच वेळी कार्य करतात, ज्यामुळे रेझिस्टन्स तयार होत नाही.
    ▸ टीप: हे औषध कधीही एकटे (Solo) वापरू नका. यासोबत नेहमी मॅन्कोझेब (M-45), क्लोरोथॅलोनिल (कवच) किंवा प्रोपिनेब (अँट्राकोल) यांसारखे स्पर्शजन्य बुरशीनाशक मिसळूनच वापरावे. यामुळे राहिलेली कसर भरून निघते.

    वापराची वारंवारता (Frequency of Application):
    ▸ नियम: एका पिकाच्या हंगामात (Crop Season) हे बुरशीनाशक जास्तीत जास्त २ ते ३ वेळाच वापरावे.
    ▸ टीप: सलग (Back to back) दोन अझॉक्सिस्ट्रोबिनच्या फवारण्या कधीही घेऊ नयेत. दोन फवारण्यांच्या मध्ये किमान एक स्पर्शजन्य किंवा वेगळ्या गटाच्या बुरशीनक्षकांची फवारणी घ्यावी.

    उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):
    ▸ शास्त्रीय कारण: अझॉक्सिस्ट्रोबिन हे बुरशीचे 'बीजाणू अंकुरण' रोखण्यात सर्वोत्तम आहे. जेव्हा बुरशीचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढतो (High Infestation), तेव्हा बुरशीनाशकाला दाद न देणारी 'म्युटंट' बुरशी तयार होण्याची शक्यता जास्त असते.
    ▸ टीप: रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढल्यावर (Curative) याचा वापर टाळावा. त्याऐवजी 'कर्झेट' (Cymoxanil) किंवा 'मेलोडी' सारखी बुरशीनाशके वापरावीत.अमिस्टारचा वापर शक्यतो रोग येण्यापूर्वी (Preventive) करणे सर्वात सुरक्षित आहे.

    जैविक बुरशीनाशकांचा वापर (Use of Bio-fungicides):
    ▸ शास्त्रीय कारण: रासायनिक बुरशीनाशकांच्या सततच्या माऱ्यामुळे बुरशीची प्रतिकारशक्ती वाढते. जैविक घटकांची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी असते जी रासायनिक रेझिस्टन्स तोडण्यास मदत करते.
    ▸ टीप: रासायनिक साखळी तोडण्यासाठी मधल्या काळात 'ट्रायकोडरमा' (Trichoderma) किंवा 'बॅसिलस सबटिलिस' ची फवारणी घ्यावी. हे रेझिस्टंट बुरशीला मारण्यासाठी प्रभावी ठरतात.

    योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):
    ▸ शास्त्रीय कारण: कमी डोस वापरल्यास बुरशीवर 'निवड दबाव' (Selection Pressure) कमी पडतो आणि अर्धमेली बुरशी जिवंत राहून आपली पुढील पिढी अधिक शक्तिशाली बनवते.
    ▸ टीप: नेहमी शिफारस केलेला डोस (साधारण १ मि.ली. प्रति लिटर) तंतोतंत वापरावा आणि पानांच्या दोन्ही बाजूंना बुरशीनाशक पोहचेल असे कव्हरेज घ्यावे.