Adama Bazak
Adama Bazak
Adama
Out of stock
Couldn't load pickup availability
उत्पादन माहिती
Product Details
रासायनिक घटक
Chemical Composition
Dinotefuran 11.7% WDG
Neonicotinoids
🎥 उत्पादन व्हिडिओ
Galileo वापराचे फायदे जाणून घ्या 👇
- मोफत घरपोच सेवा
- मार्केट पेक्षा कमी दर
- जलद घरपोच सेवा
Share

पर्यायी उत्पादने
उत्पादन माहिती
-
रासायनिक घटक
▸यामध्ये पायमेट्रोझिन २९.२% + डायनोटफ्युरॉन ११.७% डब्ल्यू.डी.जी. (Pymetrozine 29.2% + Dinotefuran 11.7% WDG) हे रासायनिक घटक असतात. जो WDG स्वरूपात असतो. WDG म्हणजे पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूप (Water Dispersible Granules) आहे.
-
रासायनिक गट
▸हे पायरीडिन अझोमेथिन (Pyridine azomethine) आणि निओनिकोटीनोइड्स (Neonicotinoids) या दोन वेगवेगळ्या रासायनिक गटांचे शक्तिशाली मिश्रण असलेले कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸हे एक आधुनिक संयुक्त (Combination) रासायनिक आंतरप्रवाही (Systemic) कीटकनाशक आहे.
-
कीटकनाशक प्रवेश मार्ग
▸हे कीटकनाशक फवारणी द्वारे वापरल्यानंतर थेट किडीच्या संपर्कात आल्यास किडीच्या शरीरात त्वचेमधून प्रवेश करते (Contact Action). तसेच हे प्रबळ आंतरप्रवाही असल्यामुळे कीटक ज्यावेळेस झाडाचा रस शोषतात, तेव्हा हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात तोंडावाटे प्रवेश करते (Stomach Action).
-
कार्यपद्धती
▸हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर आणि खाण्याच्या प्रक्रियेवर दुहेरी परिणाम करते. पायमेट्रोझिनमुळे कीटक त्वरित रस शोषण्याचे थांबवतात (Feeding blocker), तर डायनोटफ्युरॉन मज्जासंस्थेतील संदेशवहन विस्कळीत करते. यामुळे कीटकाला अर्धांगवायू होतो आणि भूकेमुळे त्यांचा मृत्यू होतो.
-
वापरण्याची पद्धत
▸फवारणी.
-
वापरण्याचे प्रमाण
▸फवारणी : १.३ ग्रॅम ते १.५ ग्रॅम प्रती लीटर पाणी.
▸एकरी प्रमाण : २६० ग्रॅम ते ३०० ग्रॅम प्रती एकर (२०० लीटर पाण्यातून).
पिके व लक्षित बुरशीजन्य रोग/किडी
-
कांदा
▸ फुलकिडे (Thrips)
-
कोबी,फुलकोबी,ब्रोकोली,रेड कॅबेज
▸ मावा (Aphids)
▸ तुडतुडे -
बटाटा
▸ मावा व तुडतुडे
▸ पांढरी माशी -
काकडी,कारले,दोडका,दुधी भोपळा,घोसवळे
▸ पांढरी माशी
▸ मावा
▸ तुडतुडे -
आले,हळद
▸ तुडतुडे
▸ फुलकिडे -
टोमॅटो
▸ पांढरी माशी (Whitefly)
▸ तुडतुडे (Jassids)
▸ मावा -
मिरची,ढोबळी मिरची
▸ फुलकिडे (Thrips)
▸ पांढरी माशी
▸ मावा -
वांगे
▸ तुडतुडे (Jassids)
▸ पांढरी माशी
▸ मावा -
भेंडी
▸ तुडतुडे
▸ पांढरी माशी -
गवार
▸ सर्व प्रकारच्या रसशोषक किडी
-
कापूस
▸ पांढरी माशी
▸ तुडतुडे (Jassids)
▸ मावा (Aphids -
झेंडू
▸ फुलकिडे
▸ मावा -
शेवंती
▸ फुलकिडे
▸ मावा -
सोयाबीन
▸ पांढरी माशी
▸ तुडतुडे -
भुईमूग
▸ तुडतुडे
▸ मावा -
वाल घेवडा
▸ मावा व तुडतुडे
▸ पांढरी माशी -
मटकी,मुग,चवळी,उडीद
▸ मावा व तुडतुडे
▸ पांढरी माशी -
हरभरा
▸ मावा
-
वाटाणा
▸ मावा
-
कलिंगड,खरबूज,डांगर
▸ पांढरी माशी
▸ मावा
▸ तुडतुडे -
भात
▸ तपकिरी तुडतुडे (BPH)
▸ हिरवे तुडतुडे (GLH)
▸ पांढऱ्या पाठीचे तुडतुडे (WBPH) -
गहू
▸ मावा (Aphids)
-
मका
▸ मावा
▸ तुडतुडे -
फ्रेंच बिन्स
▸ पांढरी माशी
▸ मावा
मुख्य वैशिष्ट्ये: प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
-
▸तुडतुडे तज्ज्ञ: हे प्रामुख्याने भातावरील तपकिरी तुडतुडे (BPH) आणि कापूस, मिरचीवरील तुडतुड्यांवर उत्कृष्ट नियंत्रण मिळवून देते.
▸त्वरित परिणाम: फवारणीनंतर अवघ्या काही मिनिटांतच कीड रस शोषण्याचे थांबवते, ज्यामुळे पिकाचे होणारे नुकसान तत्काळ थांबते.
▸उत्कृष्ट आंतरप्रवाही आणि ट्रान्सलॅमिनार गुणधर्म: हे झाडाच्या सर्व भागांत वेगाने पसरते आणि पानाच्या खालच्या बाजूला लपलेल्या किडींना प्रभावीपणे मारते.
▸दीर्घकालीन संरक्षण: यातील दोन घटकांच्या मिश्रणामुळे हे पिकाला प्रदीर्घ काळासाठी रसशोषक किडींपासून मुक्त ठेवते.
▸सुरक्षितता: शिफारसीनुसार वापरल्यास पिकावर कोणतेही विपरीत परिणाम (Phytotoxicity) होत नाहीत.
-
▸गटांची अदलाबदल (Rotation of Chemistry): बाझॅक हे Group 9B आणि Group 4A गटातील आहे. कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये म्हणून एकाच गटातील कीटकनाशकांचा वारंवार वापर टाळावा.
▸लेबल निर्देशांचे पालन: औषधाचा डोस ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच घ्यावा. कमी डोसमुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती लवकर विकसित होते.
▸एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता पिवळे चिकट सापळे आणि इतर जैविक पद्धतींचा अवलंब करावा.
▸मर्यादित वापर: एका पीक हंगामात या औषधाच्या जास्तीत जास्त २ फवारण्या कराव्यात.
▸मित्र कीटकांचे संरक्षण: हे औषध मधमाश्यांसाठी विषारी असल्याने, पीक फुलोऱ्यात असताना किंवा मधमाश्या सक्रिय असताना फवारणी टाळावी.